TRENDING:

Perfect Induction : तुमच्यासाठी कोणतं इंडक्शन कुकटॉप चांगलं? खरेदी करण्यापूर्वी तज्ज्ञांच्या 'या' 3 टिप्स नक्की वाचा..

Last Updated:

How To Choose Perfect Induction For Home : तुम्हाला इंडक्शन खरेदी करायचं असेल आणि कळत नसेल की, कोणत्या प्रकारचं आणि कसं इंडक्शन तुमच्या घरासाठी योग्य असेल तर या गोष्टी तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : गॅसच्या तुटवड्याच्या भीतीने लोक आता इंडक्शन कुकटॉपकडे वळले आहेत. बरेच लोक आता इंडक्शन खरेदी करत आहेत. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी इंडक्शन देखील आऊट ऑफ स्टॉक गेले आहेत. तुम्हालाही इंडक्शन खरेदी करायचं असेल आणि कळत नसेल की, कोणत्या प्रकारचं आणि कसं इंडक्शन तुमच्या घरासाठी योग्य असेल, तर आजचा हा लेख तुमच्यासाठीच.
या निकषांवरून ठरवा तुमच्यासाठी योग्य इंडक्शन कोणता..
या निकषांवरून ठरवा तुमच्यासाठी योग्य इंडक्शन कोणता..
advertisement

इंडक्शन खरेदी करताना कोणत्या गोष्टी तुम्हाला माहिती हव्यात, हे जाणून घेणं गरजेचं आहे. जसे की, इंडक्शनचा आकार, पॉवर रेटिंग, इंडक्शन टच सेन्सरवालं घ्यावं की बटनांचं. या सगळ्या गोष्टींबद्दल आज आपण बोलणार आहोत. इंस्टाग्रामवर houme_appliances या अकाऊंटवर तज्ज्ञांनी इंडक्शनबद्दल माहिती दिली आहे.

या निकषांवरून ठरवा तुमच्यासाठी योग्य इंडक्शन कोणता..

इंडक्शनचा आकार : इंडक्शनचा आकार म्हणजे इंडक्शनवर किती झोन असावे हे महत्त्वाचं. तज्ज्ञांच्या मते, जागा वाचवण्यासाठी एकच झोन असलेलं किंवा लहान इंडक्शन खरेदी करू नका. कारण भारतीय स्वयंपाक जास्त असतो आणि आपल्याला गॅसच्या 2 ते 4 शेगड्यांवर स्वयंपाकाची सवय असते. म्हणून भारतीय स्वयंपाकासाठी 2, 3 किंवा 4 झोन असलेले इंडक्शन खरेदी करा.

advertisement

टच सेन्सर की बटण : इंडक्शनवर टच पॅनेल आकर्षक दिसतात, बऱ्याच लोकांना ते खूप स्टायलिश वाटू शकतात. पण त्याचे एक नुकसानही असते. जेव्हा इंडक्शनवर चहा, दूध किंवा इत्तर द्रव पदार्थ सांडतात, उतू जातात तेव्हा कालांतराने यामुळे सेन्सर्सचे नुकसान होऊ शकते. ते खराब होऊ शकतात. तुम्हाला दीर्घकाळ टिकणारं इंडक्शन हवं असेल तर मजबूत बटण असलेलं मॉडेल निवडा.

advertisement

पॉवर रेटिंग : हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. आपल्या भारतीय स्वयंपाकाला आगीची मोठी आच किंवा जास्त पॉवरची गरज असते. कारण आपले पदार्थ खूप जास्त शिजवून बनवले जातात. म्हणून तज्ज्ञांच्या मते, 1900 वॅटच्या खालचे इंडक्शन भारतीयांसाठी बनलेच नाही. कमी वॅट म्हणजे स्लो कुकिंग. म्हणून फास्ट आणि परफेक्ट कुकींगसाठी हाय वॅटेज म्हणजे किमान 2000 वॅट असलेले इंडक्शन निवडा.

advertisement

काही महत्त्वाच्या टिप्स..

इंडक्शनची योग्य प्लेसमेंटदेखील महत्त्वाची असते. स्वयंपाक करणं सोपं व्हावं म्हणून इंडक्शन नेहमी तुमच्या गॅसजवळ ठेवा. तिथे एखादा इलेक्ट्रिकल पॉइंट असणं महत्त्वाचं. या सर्व गोष्टी पाळून तुम्ही तुमच्यासाठी एक परफेक्ट काही दीर्घकाळ टिकणारा इंडक्शन निवडू शकता.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबाच्या दरात मोठी उलथापालथ, कांदा आणि द्राक्षाला काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Perfect Induction : तुमच्यासाठी कोणतं इंडक्शन कुकटॉप चांगलं? खरेदी करण्यापूर्वी तज्ज्ञांच्या 'या' 3 टिप्स नक्की वाचा..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल