आज आम्ही तुम्हाला सोपे मार्ग सांगणार आहोत ज्यामुळे तुमचं मुल फक्त तुमचं सांगून ऐकणारच नाही तर त्यांच्या वागण्यातही बराच फरक दिसून येईल.
मुलांना पर्याय द्या
पर्याय दिल्याने मुलांच्या वागण्यात फरक पडू शकतो. कारण माझ्या आई-वडिलांनी माझ्यावर काहीतरी लादलंय या भावनेपेक्षा मी काहीतरी निवडलंय ही भावना मुलांवर चांगलीच परिणामकारक ठरू शकते. एक उदाहरण पाहुयात. (रिया ही एक आई आहे तर राशी ही तिची मुलगी आहे.) आपली मुलगी राशी एकच गोष्ट अनेकदा सांगूनही ऐकत नाही म्हणून रिया नाराज असते. राशी रात्री उशीरापर्यंत खेळत असते किंवा टिव्ही पहात असते. रियाने तिला झोपायला सांगितलं की राशी ऐकत नाही. तिच्याकडे दुर्लक्ष करून ती खेळत राहते. तसं पहायला गेलं तर याच चुकीचं काही नव्हतं. कारण लहान मुलं असतातच अशी की, त्यांना एक सांगितलं की ते त्याच्या विरूद्ध काहीतरी करतात. त्यामुळे राशी रोज रात्री उशीरापर्यंत टिव्ही पहात बसायची किंवा खेळत राहायची. हा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होता. एके दिवशी रियाला मुलांना पर्याय देण्याच्या मुद्याविषयी कळलं.
advertisement
प्रतिकात्मक चित्र
त्या रात्री तिने राशीला जवळ बोलावलं आणि सांगतिलं, ‘राशी तुझी झोपायची वेळ झालीये. आज झोपताना मी तुला गोष्ट सांगणार आहे. तुला कोणती गोष्ट ऐकायला आवडेल, परीची की पंचतंत्रातली’. राशी ऐकून आश्चर्यचकीत झाली. राशीने लगेच सांगितलं, ‘मला परीची गोष्ट ऐकायची आहे’ आणि राशी झोपण्यसाठी बेडवर गेली सुद्धा. आता आश्चर्यचकीत व्हायची पाळी रियाची होती. कारण इतक्या दिवसांपर्यात अनेकदा मागे लागूनही न ऐकणारी राशी लगेचच झोपायला तयार झाली होती.
हेसुद्धा वाचा : Parenting Tips : मोबाईल दाखवल्याशिवाय मुलं जेवत नाहीत, 2 सोप्या टिप्समुळे सुटेल सवय
पर्यायाचे फायदे
जर तुमचं मूल एखाद्या गोष्टीवर ठाम असेल किंवा तुम्ही सांगितलेलं त्याला पटत नसेल तर त्यांना फक्त एकापेक्षा अधिक पर्याय द्या. त्यामुळे मुलाला वाटेल की, त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे. जेव्हा पालक म्हणून एखादी गोष्ट आपण मुलांना सांगत असतो तेव्हा अनेकदा त्यांच्या बालबुध्दीला ती गोष्ट पटत नाही. कारण मुलांना असं वाटतं की, आपण त्यांना आदेश देतोय. ज्याचं पालन करणं त्यांना आवडतं नाही. त्यामुळे जेव्हा आपण त्यांच्यासमोर पर्याय ठेवतो. तेव्हा त्यांना निर्णय घेण्याची संधी मिळते. ज्यामुळे पालकांचं काम सोपं होऊ शकतं.यामुळे मुलं हळूहळू स्वत:चा निर्णय घ्यायला तयार होतात. याशिवाय एखादा निर्णय चांगला की वाईट हे सुद्धा त्यांना अनुभवातून शिकायला मिळतं. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वासही वाढून मानसिक विकास व्हायला मदत होते. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुमची मुलं तुमचं ऐकत नसतील तर त्यांना पर्याय देऊन पाहा. ते निश्चितच तुमचं ऐकतील.
