कोरडं किंवा गाठयुक्त मल, आतड्यांच्या हालचालींदरम्यान वेदना, पोट पूर्णपणे साफ न होणे भूक न लागणे आणि ओटीपोटात सूज येणे ही बद्धकोष्ठतेची काही प्रमुख लक्षणं आहेत. यावर मात कशी करायची यासाठी काही सोप्या टिप्स इथे देत आहोत.
हिरव्या भाज्या
advertisement
चांगल्या आहारासाठी करण्याची पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाज्या. ज्या भाज्यांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते अशा भाजांचा वापर वाढवा. तंतुमय पदार्थांमुळे पोट सहजपणे स्वच्छ होते. फायबरयुक्त भाज्यांमध्ये ब्रोकोली, गाजर, फुलकोबी, पालक, बीटरूट, बटाटे, गोड बटाटे, सोयाबीन, मटार, भोपळा आणि इतर भाज्यांचा समावेश होतो.
कडधान्ये
राजमा, डाळी आणि अगदी मटार यासारख्या शेंगांसारख्या तंतुमय वनस्पती फायबरचे चांगले स्रोत आहेत. ज्यांचा समावेश तुमच्या आहारात केल्यामुळे तुमचं जेवण अधिक पौष्टिक होईल.
फळं
बद्धकोष्ठतेची लक्षणे कमी करण्यासाठी फळे हा देखील एक उत्तम पर्याय आहे. सफरचंद, नासपाती, द्राक्षे, ब्लॅकबेरी, रास्पबेरी आणि प्लम यासारख्या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते आणि ती फायबर्सनी समृद्ध असतात.
'वजन कमी करायचं आहे ? प्या स्वयंपाकघरातल्या मसाल्याचा ‘हा’ चहा'
याव्यतिरिक्त, आपल्या शरीराला हायड्रेटेड ठेवणे महत्वाचे आहे. हे करण्यासाठी, आपण भरपूर पिणे आवश्यक आहे. भरपूर पाणी ताज्या फळांचा रस प्यायल्याने ही लक्षणे दूर होण्यास आणि बद्धकोष्ठता टाळण्यास मदत होते.