वजन कमी करायचं आहे ? प्या स्वयंपाकघरातल्या मसाल्याचा ‘हा’ चहा
- Published by:Tushar Shete
Last Updated:
वजन कमी करण्यासाठी आणि पोटाच्या आरोग्यासाठी दालचिनीचं पाणी खूप फायदेशीर आहे. बद्धकोष्ठता आणि गॅसेसच्या समस्यांपासून दालचिनीच्या पाण्यामुळे आराम मिळू शकतो. याशिवाय दालचिनीचं पाणी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास आणि हृदय मजबूत ठेवण्यास देखील मदत करू शकते.
मुंबई : वाढतं वजन ही तरूण आणि मध्यमवयीन वर्गासाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. कालांतराने जे लोक आपले वजन नियंत्रित करू शकत नाहीत त्यांना अनेक गंभीर आणि जीवघेण्या आजारांना सामोरे जावे लागू शकते. बहुतेक लोकांना वाटते की वजन कमी करण्यासाठी फक्त व्यायाम हाच एक पर्याय आहे. मात्र असं नाहीये. तुम्ही डाएट करून तुमचं वजन कमी करू शकता. मात्र तेही शक्य नसेल तर तुमच्या किचनमधले काही मसाले वजन कमी करण्यात तुमची मदत करू शकतात.

दालचिनीचे पाणी
दालचिनी हा गरम मसाल्यातला एक पदार्थ. अनेकांच्या किचनमध्ये दालचिनी अगदी सहजपणे दिसून येते. दालचिनीचं पाणी प्यायल्याने तुमच्या शरीराचं चयापचय वाढतं. रोज सकाळी उठल्यावर दालचिनीचं पाणी प्यायल्याने तुमचं पोट बराच काळ भरलेलं राहतं, ज्यामुळे अतिरिक्त खाण्यापासून तुम्ही स्वत:ला वाचवू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही दालचिनीचा चहाही पिऊ शकता.
advertisement
वजन कमी करण्याचा जालिम उपाय
भांड्यात थोडे पाणी उकळून त्यात जिरं घाला. हे पाणी काही मिनिटे गरम करा. अधिक चांगल्या परिणामासाठी तुम्ही या पाण्यात काळी मिरी पावडर, मध आणि लिंबाचा रस घालू शकता. आता या पाण्याला गाळून घ्या. वजन कमी करण्यासाठी हे पाणी नियमितपणे प्या.
एका अहवालानुसार, वजन कमी करण्यासाठी तसेच आपल्या पोटाच्या आरोग्यासाठी दालचिनीचं पाणी खूप फायदेशीर आहे. पोट फुगणे, बद्धकोष्ठता आणि गॅस यासारख्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी हे पाणी प्यायले जाऊ शकते. याशिवाय दालचिनीचं पाणी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास आणि हृदय मजबूत ठेवण्यास देखील मदत करू शकते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 18, 2024 2:54 PM IST