मात्र सध्या बाजारात खाण्या-पिण्याच्या पदार्थांमध्ये भेसळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. खरे काय आणि बनावट काय, हे खरेदीच्या वेळी ओळखणे सोपे नसते. अशा वेळी घरी आल्यावरच शुद्धतेची खात्री करता येते. चहा पत्त्यांमध्येही आता भेसळ केली जात असल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे घरच्या घरी खास पद्धतीने शुद्ध आणि भेसळयुक्त चहा पत्ती ओळखता येते.
advertisement
‘फूडफार्मर’ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शुद्ध आणि भेसळयुक्त चहा पत्ती ओळखण्यासाठी एक अतिशय सोपी टेस्ट सांगितली आहे. चला पाहूया याबद्दल संपूर्ण माहिती आणि ही टेस्ट कशी करायची.
शुद्ध आणि भेसळयुक्त चहा पत्ती कशी ओळखायची?
तुम्ही कोणत्याही ब्रँडची किंवा उघडी चहा पत्ती आणली असेल आणि तिची चव योग्य वाटत नसेल किंवा चहा बनवल्यावर रंग नीट येत नसेल, तर घरीच सहज तपासणी करता येते. चहा पत्तीत भेसळ आहे की नाही हे पाहण्यासाठी एक छोटीशी ‘मॅग्नेट टेस्ट’ करता येते. या टेस्टमधून चहा पत्तीत लोखंडी भुसा (iron filings) मिसळलेले आहे का? हे कळते. जर असे टेस्ट घरी शक्य असतील तर ब्रँड्सनीही प्रत्येक बॅचची नीट तपासणी करून शुद्धतेचे रिपोर्ट दाखवायला हवेत.
चुंबक टेस्ट कशी करायचा?
- चहा पत्तीची शुद्धता तपासण्यासाठी दोन वेगवेगळ्या वाट्यांमध्ये थोडी-थोडी चहा पत्ती घ्या. आता त्या वाटीत छोटा चुंबक टाका. जर चहा पत्ती चुंबकाला चिकटली, तर समजा ती भेसळयुक्त आहे आणि त्यात लोखंडी भुसा मिसळलेला आहे.
- जर चुंबक बाहेर काढल्यानंतर एकही चहा पत्तीचा कण त्याला चिकटला नसेल, तर समजा चहा पत्ती खरी आणि शुद्ध आहे आणि त्यात कोणतीही भेसळ केलेली नाही.
- खरं तर काही कंपन्या चहा पत्तीचे वजन वाढवण्यासाठी त्यात लोखंडी भुसा मिसळतात. अशा चहा पत्त्यांपासून बनलेला चहा आरोग्यासाठी किती घातक असू शकतो, याची कल्पना न केलेलीच बरी. त्यामुळे पुढच्यावेळी जेव्हा तुम्ही चहा पत्ती खरेदी कराल, तेव्हा वापरण्यापूर्वी हा मॅग्नेट टेस्ट नक्की करून पाहा.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
