TRENDING:

घरच्या घरी टपरीसारखा कडक चहा कसा बनवायचा? फक्त एक पदार्थ टाकताच होईल कमाल, Secret Recipe

Last Updated:

टपरीवरील चहा पिण्याचा मोह कित्येकांना आवरत नाही. मात्र घरी असा चहा मिळत नाही याचे दुःख अनेकांना जाणवत असेल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: टपरीवरील चहा पिण्याचा मोह कित्येकांना आवरत नाही. असे अनेक लोक आहेत, ज्यांना काम करताना चहा प्यायला खूप आवडतो. कामाचं टेन्शन असो किंवा मग कोणती आनंदाची गोष्ट साजरी करायती असो, टपरीवर जाऊन चहा पिण्यासाठी कोणतेही कारण पुरेसे आहे. अनेकांना तर दिवसभरात ते किती कप चहा पितात हेच माहित नसतं. मात्र घरी असा चहा मिळत नाही याचे दुःख अनेकांना जाणवत असेल. घरी बनवला जाणारा चहा आणि टपरीवर मिळणारा चहा यामध्ये खूप तफावत असते. तुम्हालाही घरच्या चहापेक्षा टपरीवर मिळणारा चहा जास्त आवडतो का? पण तसा चहा घरी बनवणं कठीण वाटतं? तर आता तुमचं टेन्शन कमी होणार आहे. आज आपण घरच्या घरी टपरीसारखा चहा कसा बनवायचा याची सिक्रेट रेसिपी पाहणार आहोत.
टपरीवरील चहा पिण्याचा मोह कित्येकांना आवरत नाही. मात्र घरी असा चहा मिळत नाही याचे दुःख अनेकांना जाणवत असेल.
टपरीवरील चहा पिण्याचा मोह कित्येकांना आवरत नाही. मात्र घरी असा चहा मिळत नाही याचे दुःख अनेकांना जाणवत असेल.
advertisement

टपरीवर बनवला जाणारा चहा आणि घरी बनवला जाणारा चहा हा पूर्णपणे वेगळा असतो, चहा बनवण्याची पद्धतही पूर्ण वेगळी असते.

Dussehra 2024: दसऱ्याला सोनं म्हणून आपट्याचीच पानं का वापरतात? हे कारण कोणालाच माहित नसेल

- सर्वप्रथम चहाचे भांडे घ्या आणि त्यात दूध उकळायला ठेवा.

- दूध उकळू लागल्यावर त्यात कुटलेली वेलची टाका.

advertisement

- काही वेळाने त्यात चहापत्ती टाकावी आणि चहा उकळू द्यावी.

- याचवेळी त्यात आले, लवंग आणि काळीमिरी टाकावी आणि चहा छान उकळावी.

- जवळपास १० मिनिटे चहा उकळू द्यावा.

- जेव्हा चहा थोडा घट्ट होऊ लागेल आणि चहाचा सुगंध येऊ लागेल तेव्हा गॅस बंद करावा. आता गरमागरम चहाचा आस्वाद घ्यावा.

advertisement

टपरीसारखा चहा बनवताना त्यात पाण्याचे प्रमाण कमी आणि दूध जास्त वापरावे. वर दिलेल्या पद्धतीने तुम्ही चहा बनवला तर तुम्ही अगदी टपरीसारखा चहा घरच्या घरी बनवू शकता.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
घरच्या घरी टपरीसारखा कडक चहा कसा बनवायचा? फक्त एक पदार्थ टाकताच होईल कमाल, Secret Recipe
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल