चपाती केक बनवण्यासाठी साहित्य :
शिल्लक राहिलेल्या 4 ते 5 चपात्या, तवा, दूध, बिस्कीट, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, साखर, कुकर किंवा ओव्हन, तूप, बेकिंग पेपर, केक बनण्यासाठी लागणार भांड.
चपाती केक बनवण्याची कृती :
सर्वात आधी चपात्या तव्यावर शेकून घ्या. चपात्या तव्यावर तोपर्यंत शेका जोपर्यंत त्या कड़क होत नाहीत. चपात्या कडक झाल्यावर त्या मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्या आणि त्याची बारीक पावडर तयार करा. मग तुम्ही पार्ले बिस्कीट किंवा कोणतंही बिस्कीट मिक्सरमध्ये ग्राइंड करा आणि त्याची देखील पावडर बनवा. आता चपाती आणि बिस्कीटची पावडर एकत्र मिक्स करा. मग त्यात दूध टाकून एक पातळ बॅटर बनवून घ्या. तयार बॅटर प्रमाणे त्यात साखर टाका. मग यात एक चमचा बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा मिक्स करा. तुमच्याकडे थोडी टूटी-फ्रूटी असल्यास त्या बॅटरमध्ये टाका. केक बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या भांड्याला आतून तूप लावून घ्या आणि त्यात बेकिंग पेपर टाका.
advertisement
अंड्यामधील पिवळ्या बलकाचे ही आहेत फायदे, मग ते खायचं की नाही? डायइटीशियनं दिला सल्ला
केकच्या भांड्यात संपूर्ण बॅटर टाका. कुकरच्या झाकणाचा रबर काढून तो कुकर काहीवेळ गरम करा. कुकर गरम झाला की त्यात स्टॅन्ड ठेऊन त्यावर केकच भांड ठेवा. 25 ते 30 मिनिटं कुकरमध्ये याला झाकून ठेवा. अशाप्रकारे तुमचा स्वादिष्ट चपाती केक तयार होतो. तुम्ही हा केक बनवण्यासाठी कुकर ऐवजी ओव्हनचा वापर देखील करू शकता.