खाण्याच्या वेळा बदला
तुम्हाला कधीही, काहीही खावसं वाटत असेल तर आधी हा प्रकार बंद करा. तुम्ही रात्री उशीरा जेवत असाल तर तुमच्या खाण्याची वेळ बदला. रात्री उशीरा जेवल्याने आणि जेवल्यानंतर लगेचच झोपल्याने तुमच्या चयापचय क्रियेवर फरक पडू शकतो. त्यामुळे रात्री 8 नंतर जेवण करणं बंद करा. फारच भूक लागली तर अल्पोपहार घ्या.
advertisement
'जंक फूड खाल्ल्याने मुलांना गंभीर समस्या, डोळ्यांची दृष्टीही होऊ शकते कमी, नेमकं काय करावं?'
जेवणाचं नियोजन करा
आपण जसे एखाद्या परीक्षेला सामोरे जातो, त्यासाठी अभ्यासाचं नियोजन करतो, त्याच पद्धतीने वेटलॉस आणि जंकफूड टाळणं ही एक परीक्षा समजा. दिवस आणि आठवड्यासाठी तुमच्या जेवणाचं आणि नाश्त्याचं आगाऊ नियोजन करा जेणेकरून तुम्हाला काय खायचं हे आधीच कळेल. जर तुम्हाला दिवसभरात काय खायचं हे माहित असेल, आणि जेव्हा तुम्हाला भूक लागेल, तुम्हाला जंक फूड खाण्याची इच्छा होत असेल त्यावेळी हे टाईमटेबल कामाला येईल. कारण कोणत्या दिवशी काय आणि किती वाजता खायचं आहे हे तुम्हाला माहिती असल्यामुळे तुम्ही जंक फूड टाळू शकता जेणेकरून कॅलरीज बर्न करण्याचे तुमचे सुरू असलेले प्रयत्न वाया जाणार नाहीत.
जंक फूड बंद करण्याऐवजी टाळा
वाचून आश्चर्य वाटलं ना? पण हे खरं आहे. कोणतीही गोष्ट करायची असेल तर सातत्य आणि परिश्रमांची गरज असते. तुम्ही थेट जंकफूड बंद करण्याऐवजी टाळायला सुरूवात करा. अन्यथा एकेदिवशी तुम्हाला जंकफूड खाण्याची इतकी इच्छा होईल की तुम्ही केलेले सगळे प्रयत्न फुकट जातील. खाण्याच्या वेळेसोबत तुमच्या झोपण्याचं वेळापत्रक बनवा.
'घरबसल्या वजन कमी करायचं आहे ? ‘या’ पद्धतीने प्या जिरं पाणी आणि फरक पाहा'
पाणी पिण्याचं प्रमाण वाढवा
आपण अनेकदा तहानेला भूक मानतो. त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्हाला जंक फूड खाण्याची इच्छा होईल, तेव्हा एक ग्लासभर पाणी प्या आणि 20 मिनिटे थांबा. भूक संपल्याचं तुमचं तुम्हालाच जाणवेल.