1. 'बर्फाचा' जादुई वापर
भाजीतील जास्तीचं तेल काढण्यासाठी हा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे.
कसे करावे: 2-3 बर्फाचे खडे एका स्वच्छ सुती कपड्यात गुंडाळा किंवा थेट चमच्यात बर्फ घ्या. हा बर्फाचा खडा भाजीच्या वरच्या थरावरून फिरवा. थंड संपर्कामुळे भाजीतील जास्तीचं तेल गोठून बर्फाला किंवा त्या कपड्याला चिकटतं. त्यानंतर तुम्ही ते सहज काढून टाकू शकता.
advertisement
2. ब्रेडचा स्लाईस ठरेल उपयोगी
जर भाजी रस्सेदार किंवा ग्रेव्हीची असेल, तर ब्रेड तुमच्या मदतीला येऊ शकतो.
कसे करावे: एक ब्रेडचा स्लाईस घ्या आणि तो भाजीच्या वरच्या थरावर हलकेच ठेवा. ब्रेडमध्ये तेल शोषून घेण्याची क्षमता असते. काही सेकंदातच ब्रेड जास्तीचं तेल शोषून घेईल. लक्षात ठेवा, ब्रेड जास्त वेळ भाजीत ठेवू नका, नाहीतर तो विरघळू शकतो.
3. उकडलेला बटाटा
भाजीतील तेल कमी करण्यासोबतच भाजीची चव वाढवण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
कसे करावे: जर रस्सा भाजी असेल, तर त्यात एका उकडलेल्या बटाट्याचे मोठे तुकडे करून टाका. बटाटा जास्तीचं तेल आणि मीठही शोषून घेतो. भाजी वाढताना तुम्ही हे बटाटे बाजूला काढू शकता किंवा त्यात मॅश करून ग्रेव्ही दाट करू शकता.
4. भाजलेले बेसन किंवा शेंगदाणा कूट
हा उपाय कोरड्या किंवा लडबडीत भाजीसाठी अत्यंत प्रभावी ठरतो.
कसे करावे: जर भाजीला जास्त तेल सुटलं असेल, तर त्यात थोडे भाजलेले बेसन किंवा शेंगदाण्याचे कूट मिक्स करा. यामुळे जास्तीचं तेल शोषलं जाईल आणि तुमच्या भाजीला एक छान दाटसरपणा आणि खमंग चव येईल.
5. टिश्यू पेपरचा वापर
जर भाजी कोरडी असेल आणि त्यावर तेल दिसत असेल, तर किचन टिश्यू पेपर वापरा.
कसे करावे: भाजीच्या वरच्या भागावर हळूवारपणे टिश्यू पेपर दाबून धरा. टिश्यू पेपर जास्तीचे तेल शोषून घेईल. भाजी जास्त गरम असताना हे करताना सावधगिरी बाळगा.
मोजून तेल वापरा: फोडणी देताना थेट डब्यातून तेल न ओतता नेहमी चमच्याने मोजून टाका.
कांदा नीट भाजून घ्या: अनेकदा कांदा अर्धवट भाजला गेल्यामुळे तो तेल सोडतो, त्यामुळे कांदा गुलाबी होईपर्यंत परतावा.
नॉन-स्टिक भांडी: शक्य असल्यास नॉन-स्टिक कढईचा वापर करा, ज्यामुळे कमी तेलातही भाजी उत्तम शिजते.
स्वयंपाकात चुका होणं स्वाभाविक आहे, पण त्या कशा सुधारायच्या हे माहीत असेल तर तुमचं काम सोपं होतं. या ट्रिक्समुळे तुमची भाजी केवळ चविष्टच होणार नाही, तर ती आरोग्यासाठी 'हेल्दी' देखील राहील.
