TRENDING:

Mumbai Guide : 50 रुपयांत बघा 200 कोटींचा 'मन्नत', मुंबईत आल्यावर शाहरूखचा बंगला बघायला कसं जायचं?

Last Updated:

How To Reach Srk Mannat Bungalow Mumbai : बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानचा आलिशान बंगला मन्नत पाहण्यासाठी दररोज हजारो चाहते मुंबईत येतात. बांद्र्यातील सी-फेसवर असलेला हा बंगला पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरला आहे. रेल्वे, बस किंवा रिक्षाने इथे सहज पोहोचता येते. मुंबईत आलात तर मन्नत जरूर पाहा.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जेव्हा जेव्हा बॉलिवूडचा विषय निघतो तेव्हा तेव्हा आपसुकच किंग खान पहिला आठवतो. कारण भारतात नाही तर अन्य देशात बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा मोठा चाहतावर्ग असून त्याने त्याच्या मेहनतीच्या जोरावर हिंदी चित्रपटसृष्टीत आपला दबदबा निर्माण केला आहे. जर तुम्हीही या किंग खानचे फॅन आहात तर त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात ज्यात किंग खानेच मुंबईतील घर कुठे आहे तसेच त्याच्या काही आठवणी अन् बरचं काही....
News18
News18
advertisement

'टीव्हीपासून बॉलिवूडपर्यंत' बादशहाच्या कारकिर्दीची सुरुवात कधी झाली?

बॉलिवूड बादशहा म्हणून ओळख निर्माण केलल्या शाहरुख खानने 'फौजी' या मालिकेच्या माध्यामातून या अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. शाहरुख खानने बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षणासाठी दिल्लीतील हंसराज कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. ग्रॅज्युएशननंतर त्याने मास कम्युनिकेशन या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात प्रवेश घेतला. मात्र, काही वैयक्तिक कारणांमुळे तो पुढील शिक्षण पूर्ण करू शकला नाही.

advertisement

शाहरुख खानचे वडील ताज मोहम्मद खान हे व्यापारी होते तर आईचे नाव लतीफ फातिमा खान आणि बहिणीचे नाव शहनाज लाला रुख आहे. आज शाहरुख खान हा यशस्वी आणि लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. किंग खान म्हणून प्रसिद्ध असलेला शाहरुख त्याच्या कुटुबिंयासह सध्या मुंबईतील त्याच्या मन्नत या आलिशान बंगल्यात राहतो.

चला आता विषय निघाला आहे तर, या मन्नत बंगल्या विषयीचा तर या बद्दलच्या काही अनोख्या गोष्टी जाणून घेऊयात. मुंबई किंवा मुंबई बाहेरुन आलेला प्रत्येकाला किंग खानचा मन्नत हा बंगला पाहण्यासाठी उत्कुक असतो. मन्नत बाहेर आलेला प्रत्येकजण इथे फोटो काढल्याशिवाय परत जात नाही.

advertisement

कधी ऐतिहासिक व्हिला, आज बॉलिवूडचा आयकॉनिक बंगला मन्नतची कहाणी!

जेव्हा जेव्हा किंग खानेच फॅन मुंबईत गेल्यानंतर मन्नत हा बंगला पाहतात तर हरखून जातात. कारण ही तसंच आहे. किंग खान प्रमाणेच त्याचा बंगला अतिशय किंगसारखा आहे अर्थात अतिशय प्रशस्त आणि सुंदर तसेच तब्बल 27,000 चौरस फुटांमध्ये पसरलेला हा सहा मजली बंगला शाहरुख खानच्या यशाचं आणि स्टारडमचं प्रतिकच आहे. याच मन्नतच्या गॅलरीत उभं राहून शाहरुख खान अनेकदा हजारो चाहत्यांना भेटत असतो. पण प्रत्येक फॅनला हा प्रश्न पडतो की किंग खान कधी मन्नत मध्ये राहण्यासाठी गेला? त्या प्रश्नाचे उत्तर असे की, शाहरुख खान 1997 साली येस बॉस चित्रपटाचे बँडस्टँड जवळ शूट करत होता. तेव्हा त्याची नजर या बंगल्यावर पडली. त्यानंतर 2001 मध्ये शाहरुखने हा बंगला खरेदी केला.मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यावेळी किंग खानने हा बंगला केवळ 13 कोटी रुपयांना खरेदी केला होता.

advertisement

खरं तर हा आधी मन्नत हा मूळचा बंगला नव्हता तर एक राजवाडा होता. राजवाडा पूर्वी राजा बिजई सेनचा होता. 19व्या शतकात मंडी राज्याचे राजा बिजाई सेन यांनी आपल्या पत्नीसाठी हा भव्य महाल बांधला होता. मात्र 1915 मध्ये त्यांनी हा महाल मानेकजी बाटलीवाला यांना विकला. त्यानंतर मानेकजींनी या महालाचे नाव 'व्हिला व्हिएन्ना' असे ठेवले. तथापि या मालमत्तेचे मूळ मालक केकू गांधी होते, जे गुजराती वंशाचे पारशी होते. मानेकजी बाटलीवाला हे केकू गांधींचे आजोबा होते.https://www.instagram.com/p/Cw8CWlqhMI1/?img_index=2

advertisement

केकू गांधी हे सुप्रसिद्ध शिल्पकार आणि चित्रकार होते. व्हिला व्हिएन्ना शेजारी असलेली केकी मंझिल ही इमारत देखील त्यांच्या मालकीची होती. केकू गांधींचे आजोबा आणि आई व्हिला व्हिएन्ना म्हणजेच सध्याच्या मन्नतमध्ये राहत असत. नंतर अभिनेता शाहरुख खानने हा बंगला नरीमन दुबाशकडून खरेदी केला.

सुरुवातीला शाहरुख काही काळ इतर बंगल्यात राहत होता, पण आर्थिक अडचणीमुळे त्याने व्हिला व्हिएन्ना भाड्याने घेतला. त्याच काळात मानेकजींनी हा बंगला त्यांच्या बहिणीला दिला आणि स्वतः केकी मंझिलमध्ये राहायला गेले. त्यानंतर संपूर्ण कुटुंब तेथे स्थायिक झाले. आज केकी मंझिल ही प्रसिद्ध आर्ट गॅलरी म्हणून ओळखली जाते.

मानेकजींच्या बहिणीला मुले नव्हती, त्यामुळे तिने तिची संपत्ती तिच्या बहिणीचा मुलगा नरीमन दुबाश याला दिली. त्याच नरीमनकडून शाहरुख खानने नंतर हा बंगला विकत घेतला. सांगितले जाते की शाहरुखने हा बंगला खरेदी करण्यासाठी नरीमनला अनेकदा विनवणी केली होती कारण तो विक्रीस तयार नव्हता.

रिपोर्ट्सनुसार, नरीमनचा मुलगा आयरीश हा शाहरुखचा मुलगा आर्यनचा जवळचा मित्र होता. शाहरुखने पहिल्यांदा हा व्हिला पाहताच तो त्या वास्तूवर फिदा झाला आणि लगेचच खरेदी करण्याचा निर्णय घेतला. शेवटी, नरीमनने 26,328.52 चौरस फूट क्षेत्रफळ असलेला हा बंगला शाहरुखला 13 कोटी रुपयांना विकला.

आज या मन्नतची किंमत तब्बल 200 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. सुरुवातीला शाहरुखला आपल्या घराचे नाव जन्नत ठेवायचे होते, पण हे घर मिळाल्यानंतर त्याच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्याने त्याने नाव बदलून मन्नत ठेवले.

मन्नतला कसे जायचे? जाणून घ्या संपूर्ण मार्गदर्शन

शाहरुख खानच्या आलिशान ''मन्नत'' बंगल्याला भेट देण्याची अनेकांची इच्छा असते. मुंबईतील बांद्रा भागात समुद्रकिनाऱ्यावर असलेले हे ठिकाण पर्यटकांसाठी एक खास आकर्षण आहे. पण मन्नतपर्यंत पोहोचायचं कसं? हे जाणून घेऊया टप्प्याटप्प्याने.

मुंबईतील वेगवेगळ्या रेल्वे मार्गांवरून मन्नतला कसे जावे?

मुंबईची लोकल ट्रेन ही शहराची लाइफलाइन म्हणून ओळखली जाते. त्यामुळे मन्नतला पोहोचण्यासाठी सर्वात सोपा आणि जलद मार्ग म्हणजे लोकल रेल्वे.

1) वेस्टर्न रेल्वे (Western Line)

जर तुम्ही मुंबईच्या वेस्टर्न लाईनवर राहत असाल, तर तुमच्यासाठी हा सर्वात सोपा मार्ग आहे. तुम्हाला थेट बांद्रा स्टेशनवर उतरावे लागेल. बांद्रा हे मन्नतच्या अगदी जवळचे स्टेशन आहे. येथे उतरल्यावर तुम्ही सहजपणे बस, रिक्षा किंवा कॅबने मन्नतपर्यंत पोहोचू शकता.

2) सेंट्रल रेल्वे (Central Line)

जर तुम्ही सेंट्रल लाईनवरील कुठल्याही भागात राहत असाल, जसे की ठाणे, कल्याण, डोंबिवली किंवा सीएसटी परिसर, तर प्रथम तुम्हाला दादर स्टेशनपर्यंत यावे लागेल. दादर हे सेंट्रल आणि वेस्टर्न लाईनला जोडणारे एकमेव महत्त्वाचे स्थानक आहे. दादर स्टेशनवर उतरल्यानंतर वेस्टर्न लाईनवरील ट्रेन पकडा आणि थेट बांद्रा स्टेशनकडे निघा. हा प्रवास केवळ 10-15 मिनिटांचा असेल.

3) हार्बर लाईन (Harbour Line)

जर तुम्ही हार्बर लाईनवर राहत असाल, जसे की वाशी, नेरुळ किंवा पनवेल परिसर तर तुम्हाला प्रथम कुर्ला स्टेशनपर्यंत यावे लागेल. त्यानंतर कुर्ला स्थानकावरून लोकल बदलून वेस्टर्न लाईनवरील बांद्रा स्टेशनवर पोहोचा.

बांद्रा स्टेशनवरून मन्नतपर्यंत कसे जावे?

बांद्रा स्टेशनवर उतरल्यावर पुढचा प्रवास अतिशय सोपा आहे. खालील पर्याय तुम्ही वापरू शकता.

1)रिक्षा किंवा टॅक्सी

बांद्रा स्टेशनच्या पश्चिमेकडून बाहेर पडल्यावर तुम्हाला सहज रिक्षा किंवा टॅक्सी मिळेल. ''बांद्रा बँडस्टँड'' किंवा ''शाहरुख खानचा मन्नत बंगला'' एवढं सांगितलं की चालक तुम्हाला थेट पोहोचवेल. साधारणपणे हा प्रवास 10-15 मिनिटांचा असून भाडं 60 ते 100 रुपयादरम्यान असू शकतं.

2)बस सेवा

बांद्रा स्थानकातून बँडस्टँडकडे जाणाऱ्या BEST बसदेखील उपलब्ध आहेत. स्टेशन बाहेरून बस मिळते. बसमधून जाताना तुम्हाला समुद्रकिनाऱ्याचं अप्रतिम दृश्य दिसेल.

ऑनलाइन कॅब सेवा

जर तुम्हाला आरामदायी प्रवास हवा असेल, तर तुम्ही ऑला, उबर किंवा रॅपिडो सारख्या ऑनलाइन सेवांचा वापर करू शकता. या कॅब्स तुम्हाला थेट मन्नतच्या गेटपर्यंत पोहोचवतील.

मन्नतचे ठिकाण आणि Google Maps मार्ग

https://www.google.com/maps/dir/Bandra+Station+(West),+Patkar+Blocks,+Bandra+West,+Mumbai,+Maharashtra/King+Khan's+Mannat,+Siraj+Dokadia+Rd,+Mount+Mary,+Bandra+West,+Mumbai,+Maharashtra+400050/@19.0514347,72.8198388,15z/am=t/data=!4m14!4m13!1m5!1m1!1s0x3be7c923313ad9fd:0x6a2fb4343c0c0f62!2m2!1d72.840237!2d19.0549903!1m5!1m1!1s0x3be7c9003a61414d:0xf81873723b7b8e95!2m2!1d72.8200809!2d19.0468349!3e3?entry=ttu&g_ep=EgoyMDI1MTAwOC4wIKXMDSoASAFQAw%3D%3D

मन्नत हा बंगला ब्रांदा बँडस्टँड प्रोमेनेड येथे आहे. हे ठिकाण माउंट मेरी चर्च आणि ताज लँड्स एंडच्या जवळ आहे. तुम्हाला नेमका मार्ग सोपा व्हावा म्हणून गुगल मॅप लिंक वापरू शकता.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दिवाळीला बनवा घरच्या घरी सुगंधित दिवे, अगदी झटपट होतील तयार,संपूर्ण Making Video
सर्व पहा

बांद्रा बँडस्टँड हा फक्त शाहरुखच्या चाहत्यांसाठीच नाही, तर मुंबईतील एक सुंदर पर्यटन स्थळ आहे. येथे तुम्ही समुद्रकिनाऱ्यावर फिरू शकता, फोटो काढू शकता आणि संध्याकाळी सूर्यास्ताचा आनंद घेऊ शकता. तर आता तुम्हालाही कळलं सीएसटी, दादर, चर्चगेट, बोरीवली किंवा कुठल्याही भागातून मन्नतला जाणं किती सोपं आहे.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Mumbai Guide : 50 रुपयांत बघा 200 कोटींचा 'मन्नत', मुंबईत आल्यावर शाहरूखचा बंगला बघायला कसं जायचं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल