मायोक्लिनिकच्या रिपोर्टनुसार हार्ट ॲटॅक येण्याच्या काही दिवस आधी छाती आणि आसपासच्या भागात एक विचित्र दाब जाणवतो. छातीत जळजळणं, भरल्यासारखं वाटणं, दुखणं ही लक्षणंही जाणवू शकतात. हार्वर्ड हेल्थ पब्लिशिंगच्या रिपोर्टनुसार हार्ट ॲटॅक येण्याच्या साधारण 10 दिवस आधी व्यक्तीला खूप थकवा जाणवण्यास सुरुवात होऊ शकते. नॅशनल हार्ट, ब्लड ॲंड लंग इन्स्टिट्यूटच्या मते पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये हे जास्त घडतं. हृदयाला पुरेसा रक्तपुरवठा होत नसेल तर त्या व्यक्तीला खूप घाम येऊ शकतो. अपचन, मळमळ जाणवू शकते. मात्र, ही लक्षणं किरकोळ समजून त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. तुम्हाला असा कोणताही त्रास जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष न करता विश्रांती घ्यावी. डॉक्टरांचा सल्लाही घ्यावा. हृदयाला होणारा रक्तपुरवठा सुरळित नसेल तर अनेक त्रास होऊ शकतात. हार्टबीट्स वाढतात. हार्ट ॲटॅक येण्यापूर्वी त्या व्यक्तीच्या हृदयाचे ठोके वाढू शकतात.
advertisement
(Knowledge : असं फळ ज्याची फोड केल्यावर बनतं 'भाजी'; शेफनाही माहिती नसेल ते कोणतं)
हार्ट ॲटॅक येण्यापूर्वीच्या लक्षणांमध्ये छाती, खांदे, हात, मान आणि जबडा दुखणं ही लक्षणंही आहेत. हृदयाची समस्या निर्माण होणार असेल तर रक्तावाहिन्या आखडतात. त्यामुळे शरीरात वेदना होऊ शकतात.
तुम्हाला सतत चक्कर येत असेल, गरगरत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. हे हार्ट ॲटॅकचं लक्षण असू
शकतं. चक्कर, श्वास घ्यायला त्रास, डोकं किंवा छातीत दुखणं ही रक्तदाब कमी होण्याची पर्यायाने हार्ट ॲटॅक येण्याची लक्षणं असू शकतात.