TRENDING:

Success Story : 4 वर्षांपूर्वी घेतला निर्णय, बिजली फुल शेतीमधून शेतकऱ्याचं नशीब पालटलं, लाखात कमाई

Last Updated:

यंदा देखील त्यांनी 10 गुंठे क्षेत्रात बिजली लागवड केली असून आतापर्यंत या शेतीतून त्यांना 80 हजार रुपयांचा नफा मिळाला असून, महिनाभरात 70 हजारांपर्यंत उत्पन्न मिळेल, असे एकूण खर्च वजा करून 1.50 लाखांपर्यंत उत्पन्न त्यांना मिळणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छत्रपती संभाजीनगर : फुलंब्री तालुक्यातील शिरोडी खुर्द येथे सुधाकर भोकरे हे गेल्या चार वर्षांपासून फुल शेती करत आहेत. गतवर्षी त्यांनी बिजली या फुलाची 20 गुंठे क्षेत्रात लागवड केली होती. यातून त्यांना 4 लाखांचे उत्पन्न मिळाले होते. यंदा देखील त्यांनी 10 गुंठे क्षेत्रात बिजली लागवड केली असून आतापर्यंत या शेतीतून त्यांना 80 हजार रुपयांचा नफा मिळाला असून, महिनाभरात 70 हजारांपर्यंत उत्पन्न मिळेल, असे एकूण खर्च वजा करून 1.50 लाखांपर्यंत उत्पन्न त्यांना मिळणार आहे. तसेच फुल शेती कशा पद्धतीने करावी? इतर शेतकऱ्यांनी फुलशेतीत यावे का याबद्दल सविस्तर माहिती लोकल 18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
advertisement

शिरोडी खुर्द येथे सुधाकर भोकरे यांची बिजली फुल शेती चांगल्या दर्जाची असून या शेतीचे व्यवस्थापन देखील योग्य पद्धतीने आहे. या शेतीत येण्याची कल्पना त्यांना फुल बाजारामध्ये गेल्यामुळे तसेच फुलांचे भाव चांगले असल्यामुळे फुलांना मागणी देखील असल्यामुळे त्यांनी फुलशेतीत येण्याचा निर्णय घेतला आणि बाजाराचा अभ्यास करून या शेतीला सुरुवात केली.

Success Story : शिक्षकाने पारंपरिक पिकांना दिला फाटा, केली खरबूज आणि टरबूज लागवड, 65 दिवसांत अडीच लाख नफा

advertisement

बिजली फुल शेतीमध्ये पाणी व्यवस्थापन खूप गरजेचे आहे, त्यामुळे पाणी फुलांच्या कलमाच्या बाजूने द्यावे लागते. सुरुवातीच्या काळात खत व पाणी ड्रीपद्वारे द्यायचे. मात्र, काही कालावधीनंतर कलमाच्या मधोमध पाणी जाईल, या पद्धतीने पाणी देणे महत्त्वाचे आहे, त्यामुळे बिजली दर्जेदारपणे फुलून दिसते. इतर पिकांपेक्षा फुल शेतीमध्ये फायदा आहे. फुल शेती कमी वेळात, कमी जागेत आणि योग्य नियोजनाने होते, असे भोकरे यांनी सांगितले आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
इस्त्रायल-इराण युद्धाचा इंटरनेटला फटका? भारतातील डिजिटल सेवांवर काय होईल परिणाम?
सर्व पहा

नवीन शेतकऱ्यांना किंवा तरुणांना फुल शेती या व्यवसायात उत्पादन घ्यायचे झाल्यास सुरुवातीच्या काळात फुल शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे मार्गदर्शन घ्यावे, नियोजन आखणी करावी तसेच यासाठी जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी ठेवणे देखील महत्त्वाचे आहे. या फुलशेतीसाठी शेणखताचा वापर करावा, असा सल्ला देखील भोकरे यांनी दिला आहे.

मराठी बातम्या/कृषी/
Success Story : 4 वर्षांपूर्वी घेतला निर्णय, बिजली फुल शेतीमधून शेतकऱ्याचं नशीब पालटलं, लाखात कमाई
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल