चयापचय क्रिया मंदावते
जास्त वेळ बसून राहिल्याने शरीराची चयापचय क्रिया मंदावते. यामुळे खाल्लेले अन्न योग्यप्रकारे पचत नाही आणि शरीरातील चरबी वाढू लागते.
लठ्ठपणा आणि वाढलेले वजन
चयापचय मंद झाल्यामुळे शरीरातील कॅलरीज जळत नाहीत. यामुळे वेगाने वजन वाढते आणि लठ्ठपणा येतो, जे अनेक आजारांचे मूळ कारण आहे.
हृदयविकाराचा धोका वाढतो
लांब वेळ एकाच जागी बसल्याने रक्ताभिसरण बिघडते. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे हृदयविकार आणि उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो.
advertisement
पाठ आणि मानेचे दुखणे
बदललेल्या पोश्चरमुळे आणि दीर्घकाळ बसल्यामुळे पाठ, मान आणि खांद्यामध्ये वेदना सुरू होतात. यामुळे स्नायूंमध्ये ताण निर्माण होतो आणि नंतर तो जुनाट पाठदुखीचे कारण बनतो.
मधुमेहाचा धोका
बैठी जीवनशैलीमुळे शरीरातील इन्सुलिनची संवेदनशीलता कमी होते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. यामुळे टाईप-2 मधुमेहाचा धोका खूप वाढतो.
पाय सुजणे
सतत बसून राहिल्याने पायांमध्ये आणि घोट्यामध्ये सूज येऊ शकते. हे रक्ताभिसरण व्यवस्थित न झाल्यामुळे होते, आणि काही गंभीर प्रकरणांमध्ये रक्ताची गुठळी देखील तयार होऊ शकते.
यावर उपाय काय?
जर तुमचे काम बसून असेल, तर दर 30-45 मिनिटांनी थोडा वेळ उभे राहून चाला किंवा स्ट्रेचिंग करा.
स्टँडिंग डेस्क असल्यास त्याचा वापर करा आणि काम करा.
फोनवर बोलताना किंवा थोडा वेळ ब्रेक मिळाल्यास चाला. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)