TRENDING:

Pune Double Decker Bus: वाहतूक कोंडीचा प्रश्नच सुटणार, पुण्यात डबल डेकर बस धावणार, कुठं आणि कधी? संपूर्ण माहिती

Last Updated:

Pune Double Decker Bus: पुणेकरांची वाहतूक कोडींतून सुटका होणार आहे. लवकरच 90 च्या दशकातील डबल डेकर बस रस्त्यांवर धावणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. याच वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका व्हावी आणि सार्वजनिक वाहतूक अधिक सोयीस्कर व्हावी यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) कडून एक महत्त्वाचे पाऊल उचलले जात आहे. लवकरच पुण्याच्या रस्त्यांवर अत्याधुनिक डबल डेकर इलेक्ट्रिक बस धावणार असून, या उपक्रमामुळे शहरातील प्रवाशांना नवा अनुभव मिळणार आहे.
advertisement

पुणे शहरातील वाढती लोकसंख्या आणि रस्त्यांवरील वाहनांची गर्दी यामुळे वाहतूक कोंडी हा मोठा प्रश्न आहे. अरुंद रस्ते, वाढते खासगी वाहनांचे प्रमाण आणि सतत वाढणारी प्रवाशांची संख्या यामुळे सार्वजनिक वाहतुकीवर मोठा ताण पडत आहे. अशा परिस्थितीत डबल डेकर बस हा उपाय प्रवाशांसाठी दिलासा ठरू शकतो, असे पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे म्हणाले.

advertisement

PM Modi At 75: पुण्यात पहिल्यांदाच! पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन, 1000 ड्रोनचा खास शो! किती वाजता?

कशी आहे बस?

या बसमध्ये 60 आसन क्षमता आणि 25 उभे प्रवासी अशी एकूण 85 प्रवाशांची सोय आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळेत मोठ्या प्रमाणावर प्रवासी एका बसमधून प्रवास करू शकतात. सकाळी 8 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते 9 या पीक अवर्समध्ये या बसचा वापर जास्त केला तर त्यामुळे कामावर जाणाऱ्या व परतणाऱ्या पुणेकरांना मोठा फायदा होणार आहे.

advertisement

बस अत्याधुनिक सोयींनी सुसज्ज असून पूर्णपणे वातानुकूलित आहे. त्यात सीसीटीव्ही कॅमेरे, एसी सुविधा तसेच वायफायचीही सोय करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रवाशांच्या सुरक्षिततेसह आरामदायी प्रवासावर विशेष भर देण्यात आला आहे. ही बस इलेक्ट्रिक असल्यामुळे पर्यावरणपूरक असून, फक्त 2 तास चार्जिंगनंतर ती तब्बल 150 किलोमीटर धावू शकते.

या मार्गांवर ट्रायल रन

ट्रायल रनसाठी चार महत्त्वाच्या मार्गांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये हिंजवडी फेज 3 ते हिंजवडी वर्तुळ (15 किमी), रामवाडी ते खराडी (10 किमी), मगरपट्टा ते कल्याणीनगर (8 किमी) आणि पुणे स्टेशन ते लोहगाव विमानतळ (10.85 किमी) या मार्गांचा समावेश आहे. या प्रत्येक मार्गावर दोन दिवस या बसची चाचणी होणार असून, ट्रायल यशस्वी झाल्यास पुढील दोन महिन्यांत प्रत्यक्ष सेवा सुरू केली जाणार आहे.

advertisement

प्रारंभीच्या टप्प्यात दहा डबल डेकर बस पीएमपीएमएलच्या ताफ्यात सामील करण्याची योजना आखण्यात आली आहे. या बस ‘स्विच’ कंपनीकडून तयार करण्यात आल्या असून, त्यांची उंची 4.75 मीटर, रुंदी 2.6 मीटर आणि लांबी 9.5 मीटर इतकी आहे. प्रत्येक बसची किंमत तब्बल दोन कोटी रुपये आहे.

डबल डेकर इलेक्ट्रिक बस ही पुण्यातील सार्वजनिक वाहतुकीसाठी एक नवे पर्व ठरेल. प्रवाशांना आरामदायी व सुरक्षित प्रवास मिळणार असून, पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेकडेही हे एक महत्त्वाचे पाऊल असेल. तसेच, या बसमुळे गर्दीच्या वेळेत मोठ्या प्रमाणावर प्रवासी एका फेरीत प्रवास करू शकतील. या बससाठी तिकीटदर सध्याच्या एसी पीएमपीएमएल बसप्रमाणेच असणार आहे. त्यामुळे अतिरिक्त खर्च न करता प्रवाशांना अधिक आरामदायी आणि जलद प्रवासाचा लाभ घेता येणार आहे.

advertisement

पुण्यातील आयटी पार्क परिसर तसेच गर्दीच्या मार्गांवर या बस धावणार असल्याने हजारो पुणेकरांचा प्रवास सुलभ होणार आहे. डबल डेकर बसच्या रूपाने पुण्याला नवी ओळख मिळणार असून, सार्वजनिक वाहतूक सुधारण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

मराठी बातम्या/पुणे/
Pune Double Decker Bus: वाहतूक कोंडीचा प्रश्नच सुटणार, पुण्यात डबल डेकर बस धावणार, कुठं आणि कधी? संपूर्ण माहिती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल