Pune : महागाईवर ‘Toing’ ॲपचा उतारा, पुणेकरांना स्विगी देणार 50 रुपयात पोटभर जेवण

Last Updated:

Swiggy Toing App : स्विगीने पुण्यात Toing नावाचे नवीन ॲप लाँच केले आहे. या ॲपद्वारे ग्राहकांना फक्त 50 रुपयांपासून जेवण मिळणार आहे.

News18
News18
पुणे : स्विगी या ऑनलाइन फूड डिलिव्हरी क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने पुण्यातील ग्राहकांसाठी एक खास ॲप लाँच केलेले आहे. या ॲपचे नाव 'Toing' असे आहे. महागाई आणि वाढलेले डिलिव्हरी चार्जेस यामुळे ऑनलाईन जेवण ऑर्डर करणे अनेकांसाठी परवडणारे राहिलेले नाही. त्यामुळेच कमी बजेटमध्ये ग्राहकांना चांगले आणि दर्जेदार जेवण उपलब्ध करून देण्यासाठी स्विगीने हा नवा प्रयोग सुरू केला आहे.
पुण्यातील निवडक भागात उपलब्ध
सध्या 'Toing' ॲपची चाचणी केवळ पुणे शहरात केली जात आहे. ज्यात कोथरूड, हिंजवडी, वाकड, औंध आणि पिंपळे सौदागर या परिसरातील रहिवाशांना या ॲपचा लाभ घेता येतो. कंपनीच्या माहितीनुसार हे ॲप खास करून अशा लोकांसाठी बनवण्यात आले आहे जे कमी किमतीत चांगले जेवण शोधत असतात. कॉलेजमधील विद्यार्थी, वसतिगृहात राहणारे तरुण किंवा मर्यादित पगारावर काम करणारे कर्मचारी यांच्यासाठी हा पर्याय सोयीस्कर ठरू शकतो.
advertisement
50 रुपयांपासून उपलब्ध जेवण
'Toing' ॲपमधून ग्राहकांना केवळ 50 रुपयांपासून ते 250 रुपयांपर्यंतच्या किमतीचे पदार्थ मिळू शकतात. यामध्ये रोजच्या जेवणासोबतच बर्गर, पास्ता, पिझ्झा, बिर्याणी, डोसा आणि अगदी केकसारखे पदार्थही आहेत. विशेष म्हणजे 99 रुपयांखालील पदार्थांची स्वतंत्र यादी या ॲपमध्ये ग्राहकांना दिसून येईल. ग्राहकांना फक्त 30 मिनिटांत ऑर्डर मिळण्याचा कंपनीचा दावा आहे. महत्त्वाचे म्हणजे जलद सेवा आणि कमी किंमत हे या ॲपचे मोठे आकर्षण आहे.
advertisement
स्पर्धेला उत्तर
फूड डिलिव्हरी क्षेत्रात गेल्या काही महिन्यांमध्ये स्पर्धा वाढली आहे. झेप्टो कॅफे सारख्या कंपन्या कमी दरात जलद सेवा देत असल्याने स्विगीसमोर आव्हान उभे राहिले होते. या पार्श्वभूमीवर Toing ॲप हे स्विगीचे धोरणात्मक पाऊल मानले जात आहे. कंपनीला आशा आहे की यामुळे कमी उत्पन्न असलेल्या वर्गात मोठ्या प्रमाणावर ग्राहक आकर्षित होतील.
advertisement
पुणेच का निवडलं?
साधारणपणे स्विगी नवीन प्रयोग बेंगळुरूमध्ये करते. परंतू, यावेळी त्यांनी पुण्याची निवड केली आहे. पुणे हे शिक्षणाचे आणि आयटीचे महत्त्वाचे केंद्र असून येथे विद्यार्थी आणि तरुण व्यावसायिकांची मोठी संख्या आहे. ऑनलाइन फूड डिलिव्हरीच्या बाबतीतही पुणे तुलनेने कमी विकसित बाजारपेठ आहे. त्यामुळे स्विगीला वाटते की अशा प्रकारचा प्रयोग करण्यासाठी पुणे योग्य ठिकाण आहे.
advertisement
पुढील दिशा
Toing हे ॲप यशस्वी झाल्यास स्विगी ते देशातील इतर महानगरांतही सुरू करू शकते. आधीपासूनच स्विगीच्या मुख्य ॲपमध्ये 'Swiggy 99 Store' हा पर्याय उपलब्ध आहे. मात्र 'Toing' हे स्वतंत्र ॲप असल्याने ग्राहकांना अधिक स्वस्त आणि सोपा अनुभव देईल असा कंपनीचा विश्वास आहे. एकूणच महागाईच्या पार्श्वभूमीवर स्विगीने कमी बजेटमधील ग्राहकांना परवडणारे जेवण उपलब्ध करून देण्यासाठी घेतलेले हे पाऊल पुणेकरांसाठी वरदान ठरू शकते.
मराठी बातम्या/पुणे/
Pune : महागाईवर ‘Toing’ ॲपचा उतारा, पुणेकरांना स्विगी देणार 50 रुपयात पोटभर जेवण
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement