Pune Crime : आयुषच्या खुनासाठी पिस्तूल कुणी दिलं? मारेकऱ्यांनी पोलिसांसमोर दिली कबुली! बंडू नव्हे तर, खरा मास्टरमाईंड समोर!
- Published by:Saurabh Talekar
 
Last Updated:
Pune Crime Krishna andekar : गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल कृष्णाने दिले असल्याची कबुली अमन पठाण व सुजल मेरगू यांनी दिली आहे, असा युक्तीवाद सरकारी वकिलांनी कोर्टात केला आहे.
Ayush Komkar Murder Case : पुण्यातील नाना पेठ परिसरात (Pune Crime) झालेल्या हत्याकांडात 19 वर्षाच्या आयुष कोमकर याला जीव गमवावा लागला होता. पुण्यातील गँगवॉर (Pune Gang War) आता आणखी पेटलं असताना पुणे पोलिसांनी आंदेकर टोळीचा खेळ खल्लास केला आहे. मालमत्ता आणि पैशांच्या वादातून आयुषचा खून झाला असून, त्यात कृष्णा आंदेकरची (Krushna Andekar) मुख्य भूमिका आहे, असा दावा पोलिसांकडून कोर्टात करण्यात आला आहे. यावेळी कोर्टात सरकारी वकिलांनी धक्कादायक माहिती दिली.
कृष्णा आंदेकर प्रमुख 'लिंक'
कृष्णा हा मारेकरी आणि कट रचणाऱ्या आरोपींमधील प्रमुख 'लिंक' असल्याचा दावाही तपास अधिकाऱ्यांनी केल्याने सध्या खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल कृष्णाने दिले असल्याची कबुली अमन पठाण व सुजल मेरगू यांनी दिली आहे. कृष्णाने पिस्तूल कोठून आणलं, फरारी असताना तो कोणाच्या संपर्कात होता आदी मुद्द्यांवर तपास करायचा आहे.
advertisement
विलास पठारे यांची मागणी
आरोपीच्या स्थावर व जंगम मालमत्तेची माहिती मिळवायची आहे. त्यासाठी आरोपीला पोलिस कोठडी द्यावी,' अशी मागणी सहायक आयुक्त शंकर खटके व विशेष सरकारी वकील विलास पठारे यांनी केली. यावेळी त्यांनी अधिकचा तपास करण्यासाठी पोलिस कोठडी मागितली होती, कोर्टाने ही मागणी मान्य देखील केली आहे.
आरोपी स्वतःहून हजर झाला
advertisement
दरम्यान, गुन्ह्यात वापरलेलं पिस्तूल आधीच जप्त करण्यात आलं आहे. आरोपी स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाला असून, तपास यंत्रणेला सहकार्य करत आहे. त्यामुळे त्याच्या पोलिस कोठडीची आवश्यकता नाही,' असा युक्तिवाद आरोपीचे वकील अॅड. मनोज माने यांनी केला होता. त्यानंतर कोर्टाने 18 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
September 17, 2025 9:00 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : आयुषच्या खुनासाठी पिस्तूल कुणी दिलं? मारेकऱ्यांनी पोलिसांसमोर दिली कबुली! बंडू नव्हे तर, खरा मास्टरमाईंड समोर!


