जाणून घेऊयात कुंभमेळ्याची मार्गदर्शक तत्त्वे:
काय करावं ?
- जर तुम्ही कुंभमेळ्याला जाणार असाल तर तिथे कोणत्या पद्धतीचं नियोजन करण्यात आलंय, कोणत्या दिवशी महत्त्वाचे स्नान आहे, राहण्याची सोय नेमकी कुठे असेल आणि कोणत्या दिवशी व्ही.व्ही.आय.पी आणि व्ही.आय.पी येणार आहेत याची माहिती करून घेण्यासाठी https://kumbh.gov.in/ या वेबसाईटवर लॉगईन करून पूर्ण माहिती घ्या किंवा मोबाईल ॲप डाऊनलोड करा.
- प्रवासाआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. थोड्या थोड्या तासांचा प्रवास करा. तुमची औषधं सोबत ठेवा.
- रुग्णालये, खाद्यपदार्थांची दुकाने आणि आपत्कालीन सेवा यांची माहिती काढून ठेवा.
- सर्व आपत्कालीन संपर्क क्रमांक तुमच्या फोनमध्ये सेव्ह करा, किंवा डायरीत त्यांची नोंद करून ठेवा.
- ज्या स्नानांना प्रशासनाने परवानगी दिली आहे त्याच घाटांवर स्नानासाठी जा.
- तुमच्यामुळे रस्त्यावर कुठेही घाण होणार नाही याची काळजी घ्या.
- मेळा परिसरात उपलब्ध असलेल्या शौचालयाचा वापर करा.
- रस्ते शोधण्यासासाठी तुमच्या मोबाईलमधल्या गुगल मॅप्सचा किंवा दिशादर्शक फलकांचा वापर करा.
- वाहतुकीच्या नियमांचे पालन करा, तुमच्या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा होणार नाही याची काळजी घ्या. प्रशासने तयार केलेल्या जागेतच वाहनं पार्क करा.
- जर तुम्ही मेळाक्षेत्र किंवा आजूबाजुला फिरण्याचा विचार करत असाल पूर्ण माहिती घेऊनच जा.
advertisement
advertisement
advertisement
या गोष्टी करणं टाळा
- कुंभमेळ्याला हजेरी लावताना कोणत्याही मौल्यवान वस्तू, गरजेपेक्षा जास्त पैसे, अन्न आणि कपडे घेऊन जाऊ नका.
- जेवताना किंवा अंघोळ करताना अनोळखी लोकांवर विश्वास ठेवू नका.
- कोणत्याही वादात पडू नका.
- नदीमध्ये स्नान करताना मर्यादीत अंतरापेक्षा जास्त दूर जाऊ नका. अंघोळ करताना साबण वापरू नका.
- नदीमध्ये कपडे धुवू नका. किंवा निर्माल्य नदीत टाकू नका.
- जर तुम्हाला संसर्गजन्य आजार असेल तर गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका.
- कुंभमेळ्यात अचानक अवस्थ वाटू लागलं तर तिथे असलेल्या वैद्यकीय केंद्राला भेट देऊन त्वरित उपचार करून घ्या.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 11, 2024 7:33 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Kumbh Mela 2025 Visitors Guide: तुम्ही महाकुंभमेळ्याला जायचा विचार करता आहात? आधी वाचा 'ही' मार्गदर्शक नियमावली