TRENDING:

Ayurvedic leaves for High Cholesterol: कोलेस्टेरॉलचा त्रास आहे? मग रोज खा ‘ही’ पानं, विरघळून जाईल कोलेस्टेरॉल

Last Updated:

Ayurvedic leaves for High Cholesterol: जेव्हा कोलेस्टेरॉल क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात तयार होतं तेव्हा ते रक्तवाहिन्यांनांमध्ये अडकून राहतं आणि रक्तप्रवाहात अडथळा निर्माण करतं. आज आम्ही तुम्हाला काही औषधी वनस्पतींची माहिती सांगणार आहोत ज्यांची पानं खाल्ल्याने किंवा त्यांचा रस प्याल्याने रक्तातली कोलेस्टेरॉलची पातळी कमी व्हायला मदत होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आजच्या धकाधकीच्या जीवनाता हृदयविकार आणि हार्ट ॲटॅक सारखे आजार खूपच सामान्य झाले आहेत. जंकफूड, सततचा तणाव  अशी यामागची काही कारणं सांगितली जातात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हृदयाला रक्तपुरवठा न झाल्याने हार्ट ॲटॅक येतो. हृदयाला रक्तपुरवठा न होण्याचं एक कारण आहे ते कोलेस्ट्रेरॉल. हा एक असा चिकट पदार्थ आहे जो यकृताद्वारे तयार होतो. जेव्हा आपण चरबीयुक्त पदार्थ खातो, तेव्हा ते रक्तात शोषले जावून कोलेस्टेरॉल तयार होते. संप्रेरकांच्या निर्मितीसाठी आणि पचनासाठी कोलेस्टेरॉलची आवश्यकता असते, परंतु जेव्हा कोलेस्टेरॉल क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात तयार होतं तेव्हा ते रक्तवाहिन्यांनांमध्ये  अडकून राहतं आणि रक्तप्रवाहात अडथळा निर्माण करतं. त्यामुळे शरीरातून जमा होणारं अतिरिक्त कोलेस्टेरॉल शरीराबाहेर काढून टाकणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला काही औषधी वनस्पतींची माहिती सांगणार आहोत ज्यांची पानं खाल्ल्याने किंवा त्यांचा रस प्याल्याने रक्तातली कोलेस्टेरॉलची पातळी  कमी व्हायला मदत होईल आणि हृदयविकाराचा धोका टाळला जाऊ शकतो.
प्रतिकात्मक फोटो : कोलेस्टेरॉलच्या त्रासावर गुणकारी आहेत ‘ही’ पानं
प्रतिकात्मक फोटो : कोलेस्टेरॉलच्या त्रासावर गुणकारी आहेत ‘ही’ पानं
advertisement

'या' पानांचा कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी होतो फायदा.

पुदिन्याची पानं (Mint leaves)

पुदिन्याची पाने फक्त कोलेस्टेरॉलच नव्हे तर इतरही अनेक समस्यांवर गुणकारी आहेत. पुदिनाच्या पानांमुळे पचन सुधारायला मदत होते. याशिवाय युरिक एसिडचा त्रास कमी होतो. पुदिन्यांच्या पानामुळे कोलेस्टेरॉलचं रूपातंर  उर्जेमध्ये रूपांतर केलं जातं.

मेथीची पानं  (Fenugreek Leaves)

कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी मेथीची पानं उपयुक्त आहेत. यात फायबर्स आणि सॅपोनीन असतात, जे आतड्यांमधील पित्त आम्लांशी जोडून उच्च कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतात, त्यामुळे रक्तातल्या खराब कोलेस्टेरॉलचं (LDL) प्रमाण  कमी होतं.

advertisement

कढीपत्ता (Curry Leaves)

दक्षिण भारतीय जेवणात कढीपत्ताचा भरपूर वापर होताना दिसतो. तुम्ही सुद्धा जेवणात कढीपत्ता खायची सवय लावली तर तुम्हाला फायदा होईस. कढीपत्त्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे आतड्यांमधील चरबी वेगाने शोषून घेतात, ज्यामुळे कोलेस्टेरॉल वेगाने वितळतं. कढीपत्ता युरिक अॅसिड देखील कमी करू शकतो.

कडुलिंबाची पानं (Neem Leaves)

नावाप्रमाणेच कडुलिंबाचे पान कडू असते पण रक्तशुद्धीसाठी हे पान अतिशय महत्त्वाचं आहे. कडुनिंबाच्या पानांचा कोलेस्टेरॉल कमी करण्यात फायदा होतो. कडुनिंबात नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स, फ्लॅवोनॉइड्स, आणि लिपिड-कमी करणारे घटक असतात, जे शरीरातील खराब कोलेस्टेरॉल (LDL) कमी करण्यात आणि चांगल्या कोलेस्टेरॉल (HDL) चा स्तर वाढवण्यात मदत करतात.

advertisement

तुळशीची पानं (Holy Basil Leaves)

तुळशीची पाने केवळ पवित्रच नाहीत तर त्यात औषधी गुणधर्म देखील आहेत. तुळशीची पाने खाल्ल्याने कोलेस्टेरॉल कमी होते असे अभ्यासातून दिसून आले आहे. त्यात आढळणारे अँटीऑक्सिडंट्स ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करतात, ज्यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते.

हे सुद्धा वाचा : High Cholesterol : या गोष्टींमुळे वाढतं तुमच्या शरिरातील कोलेस्टेरॉल, कधीच अशी चूक करू नका!

advertisement

त्यामुळे तुम्हाला निरोगी आणि फिट राहायचं असेल तर या औषधी वनस्पतींच्या पानांच्या सेवनाने तुम्ही कोलेस्टेरॉल कमी करून फिट राहू शकता.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Ayurvedic leaves for High Cholesterol: कोलेस्टेरॉलचा त्रास आहे? मग रोज खा ‘ही’ पानं, विरघळून जाईल कोलेस्टेरॉल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल