High Cholesterol : शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल सहज काढते हे फळ, रोज सकाळी खा! डॉक्टरही देतात हाच सल्ला

Last Updated:
हाय कोलेस्टेरॉलची समस्या असलेल्या रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. अनेक तरुणही त्याला बळी पडत आहेत. कोलेस्टेरॉल वाढल्याने हार्ट अ‍ॅटॅक आणि स्ट्रोक येऊ शकतात. त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. वेळोवेळी रक्त तपासणी करून कोलेस्टेरॉलच्या पातळीवर लक्ष ठेवता येतं.
1/9
कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी लोक विविध औषधांची मदत घेतात. पण, अनेक वेळा त्यांना अपेक्षित फायदा मिळत नाही. अशा परिस्थितीत, ते खूप चिंताग्रस्त होतात आणि या समस्येपासून मुक्त होण्याचे मार्ग शोधू लागतात. यासाठी विविध प्रकारचे घरगुती उपायही करून बघितले जातात.

advertisement
2/9
जर तुम्हालाही कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यासाठी गोळ्या घेण्याचा कंटाळा आला असेल, तर कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्याचा हा सर्वात सोपा उपाय जाणून घ्या. याचा अवलंब केल्याने तुम्ही घरी बसून जास्त खर्च न करता या समस्येपासून बऱ्याच अंशी सुटका मिळवू शकता. यासाठी तुम्हाला एक फळ खावं लागेल.

3/9
दररोज सकाळी उठल्यानंतर दोन सफरचंद खाल्ल्याने शरीरात जमा झालेलं बॅड कोलेस्टेरॉल (LDL Cholesterol) झपाट्याने कमी होऊ शकतं. संशोधनातून ही बाब सिद्ध झाली आहे. रिसर्चच्या आधारे वैज्ञानिकांनी दावा केला आहे की, सफरचंद खाल्ल्याने कोलेस्टेरॉल 40 टक्क्यांनी कमी होऊ शकतं.

4/9
ब्रिटनमधील युनिव्हर्सिटी ऑफ रीडिंग आणि इटलीतील एफईएम संस्थेच्या संशोधकांनी 2019 मध्ये कोलेस्टेरॉल आणि सफरचंदांबाबत एक रिसर्च केला. या रिसर्चमध्ये त्यांनी कोलेस्टेरॉलच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांचा समावेश केला. सहभागींना नियमितपणे दोन सफरचंद खाण्यासाठी देण्यात आली आणि त्यांच्या कोलेस्टेरॉल पातळीचं मॉनिटरिंग केलं गेलं.

5/9
या रिसर्चचा निष्कर्ष पाहिल्यानंतर शास्त्रज्ञांनाही आश्चर्य वाटलं. रिसर्चमध्ये सहभागी झालेल्या लोकांनी काही आठवडे दररोज दोन सफरचंद खाल्ल्याने त्यांच्या शरीरातील बॅड कोलेस्टेरॉलची पातळी 40 टक्क्यांनी कमी झाली. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सफरचंद खाल्ल्याने खराब कोलेस्टेरॉल लेव्हल जवळपास निम्म्यावर येते. ही बाब हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

6/9
रोज सफरचंद खाल्ल्यानं हार्ट अ‍ॅटॅक आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो, असं संशोधकांचं मत आहे. सफरचंद खाल्ल्याने आपल्या रक्तवाहिन्या शिथिल होतात आणि रक्तप्रवाह सुधारतो. सफरचंदामध्ये मुबलक प्रमाणात पॉलिफेनॉल्स आणि फायबर असतं. ज्यामुळे शरीरात जमा झालेले कोलेस्टेरॉल काढून टाकलं जातं.

7/9
सफरचंदात असलेलं फायबर कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतं. फायबर शरीरात फॅटी अ‍ॅसिड तयार करतं. हे फॅटी अ‍ॅसिड आपल्या यकृतामध्ये तयार होणाऱ्या कोलेस्टेरॉलचं प्रमाण नियंत्रित करतं आणि त्याची पातळी झपाट्यानं सुधारतं. यामुळे रक्तवाहिन्यांचं कामही सोपं होतं. परिणामी हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं.

8/9
संशोधन करणाऱ्या तज्ज्ञांच्या मते, केवळ खाण्याच्या माध्यमातून कोलेस्टेरॉल पूर्णपणे नियंत्रित होणार नाही, तर त्यासोबत तुम्हाला दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम करावा लागेल. आहारात हंगामी फळे आणि भाज्यांचा समावेश करावा लागेल. याशिवाय वेळेवर झोपणं आणि वेळेवर उठणं गरजेचं आहे. रात्री उशिरापर्यंत जागरण करणं टाळलं पाहिजे.

9/9
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या रक्ताची वेळोवेळी तपासणी करून कोलेस्टेरॉलची पातळी तपासली पाहिजे. जर तुमच्या शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढत असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि उपचार घ्या. कोलेस्टेरॉलबाबत बेफिकीर राहू नका, नाहीतर ते जीवघेणं ठरू शकतं.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement