TRENDING:

Best Time to Drink Tea: चहाचे शौकीन आहात? मग चहा पिण्याची ‘ही’ योग्य वेळ माहिती आहे का ?

Last Updated:

Best Time to Drink Tea: सकाळी उठल्यावर चहा प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होऊ शकतात. मात्र रिकाम्या पोटी चहा पिणं हे धोक्याचं ठरू शकतं. रिकाम्या पोटी चहा घेतल्याने ॲसिडिटी, गॅसेस किंवा पोटाच्या इतर समस्यांचा त्रास होऊ शकतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आपल्या देशात चहाचे अनेक शौकिन आहेत. अनेकांना सकाळी उठल्यावर चहा लागतो. गरमागरम चहाचा घोट घशाखाली गेल्याशिवाय त्यांची कामाची गाडी सुरूच होऊ शकत नाही. काही जण तर असे आहेत की ते दिवसभरात केव्हाही, कधीही आणि कितीही वेळा चहा पिऊ शकतात. अशा व्यक्तींसाठी त्यांच्यासाठी चहा हा चहा नसून तो अमृतासमान आहे. काही जण झोप येऊ नये म्हणून चहा पितात तर काही जणांना जेवणानंतर चहा प्यावासा वाटतो. तुम्ही सुद्धा चहाचे शौकीन असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी.
News18
News18
advertisement

चहाचे प्रकार

जसजसा काळ बदलत गेला तसतसं चहाचे प्रकारही बदलले. काही वर्षांपूर्वी फक्त कोणतीही चहा पावडर म्हणजे चहा असं समिकरण होते. नंतर ते बदलून आसाम टी आणि दार्जिंलिंपर्यंत आलं. मात्र आजच्या 21व्या शतकात वेगवेगळ्या प्रकारचे चहा आपल्याला पहायाला मिळतात. मसाला चहा, ग्रीन टी, ब्लॅक टी, लेमन टी, कोल्ड टी, उलोंग टीस असे चहाचे प्रकार सर्रास उपलब्ध आहेत. 20 व्या शतकात टपरी पुरता मर्यादित असलेला चहा आता एक चांगला बिझनेस झालाय.

advertisement

चहा पिण्याची योग्य वेळ

अनेकांना सकाळी चहा मिळाला नाही तर त्यांना फ्रेश वाटत नाही. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा आणि सुस्ती दिसत राहते. चहामध्ये कॅफिन असतं, ज्यामुळे चहा प्यायल्याने शरीराला त्वरित ऊर्जा मिळते आणि कॅफीनमुळे सुस्ती किंवा झोप दूर व्हायला मदत होते. अनेकांना नाश्त्यासोबत चहा पिणं आवडतं, तर काही लोक नाश्त्यापूर्वी रिकाम्या पोटी चहा पितात.

advertisement

हे सुद्धा वाचा : वजन कमी करायचं आहे ? प्या स्वयंपाकघरातल्या मसाल्याचा ‘हा’ चहा

मात्र रिकाम्या पोटी चहा पिणं किंवा जेवणानंतर चहा पिणं खरंच फायद्याचं आहे का ? जाणून घेऊयात आहारतज्ज्ञांकडून.

नोएडातल्या डाएट मंत्रा क्लिनिकच्या संस्थापक आणि वरिष्ठ आहारतज्ज्ञ कामिनी सिन्हा यांनी सांगतात की, चहा पिण्यासाठी ठराविक अशी वेळ नाहीये. मात्र सकाळी उठल्यावर चहा प्यायल्याने शरीराला फायदे होऊ शकतात. रात्रभराच्या झोपेनंतर सकाळी उठल्यावर शरीराला ऊर्जेची कमतरता जाणवत असते. त्यामुळे चहा प्यायल्याने त्यांना त्वरित ऊर्जा मिळते. मात्र रिकाम्या पोटी चहा पिणं हे धोक्याचं ठरू शकतं. रिकाम्या पोटी चहा घेतल्याने ॲसिडिटी, गॅसेस किंवा पोटाच्या इतर समस्यांचा त्रास होऊ शकतो. ज्यांना आधीपासूनच असे त्रास आहेत, अशा व्यक्तींनी नाश्ता केल्यानंतर काही वेळाने चहा प्यावा. नाश्त्याच्या आधी किंवा नंतर लगेच चहा पिणं टाळावं. यामुळे शरीरातील पोषक तत्वांचं शोषण कमी होऊ शकतं. याशिवाय ज्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे अशांनी चहा पिण्यापूर्वी पाणी प्यावं आणि जास्त उकवलेला चहा पिणं टाळावं.

advertisement

जेवणानंतर चहा प्यायल्याने काय होतं ?

अनेकांना जेवण झाल्यानंतर मुखशुद्धीप्रमाणे चहा पिण्याची सवय असते. मात्र जेवणानंतर लगेच चहा प्यायल्याने अपचनाचा त्रास होऊ शकतो. मात्र जेवणानंतर अर्धा तासाने चहा घेतला तर त्यांना आश्चर्यकारक फायदे होऊ शकतात. जेवणाच्या अर्धातासाने घेतलेल्या चहामुळे पचनक्रिया वेगवान होऊ शकते आणि खाल्लेलं अन्न पचायला मदत होते. चहामध्ये टॅनिनसह इतर काही संयुगं असतात, जे पचनाला मदत करतात. जेवणानंतर चहा घेतल्याने पोटातील गॅस किंवा अपचनाची समस्या दूर होते.

advertisement

हे सुद्धा वाचा : Uric Acid Home Remedies: ‘या’ चहाने युरिक ॲसिड येईल नियंत्रणात; घरच्या घरी करा 'हा' साधा सोपा उपाय

चहा पिण्याची योग्य वेळ

तज्ज्ञांच्या मते, चहा पिण्याची योग्य वेळ तुमच्या शरीरावर आणि आरोग्यावर अवलंबून असते. जर तुम्हाला अ‍ॅसिडिटीचा त्रास नसेल तर तुम्ही रिकाम्या पोटी चहा पिऊ शकता. मात्र अपचन किंवा गॅसेसचा त्रास असेल तर जेवणानंतर एक तासाने चहा पिणं फायद्याचं ठरू शकतं. चहातल्या कॅफेनमुळे तुमचा मूड देखील सुधारू शकतो.

अति चहा प्रेम ठरू शकतं धोक्याचं

आधी सांगितल्याप्रमाणे अनेकांना दिवसातून कितीही वेळा चहा पिण्याची सवय असते. मात्र ही सवय त्यांच्यासाठी घातक ठरू शकते. आरोग्यतज्ज्ञांच्या मते दिवसातून फक्त 2 ते 3 कप चहा पिणं फायद्याचं ठरू शकतं. मात्र जास्त चहा पिणं हे धोक्याचं ठरू शकतं. सतत चहा घेत राहिल्याने पचनक्रियेलाही हानी पोहोचू शकते.

हे सुद्धा वाचा : Tulsi Tea: स्वस्थ राहायचं आहे मग प्या ‘हा’ चहा; होतील अनेक फायदे

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Best Time to Drink Tea: चहाचे शौकीन आहात? मग चहा पिण्याची ‘ही’ योग्य वेळ माहिती आहे का ?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल