Uric Acid Home Remedies: ‘या’ चहाने युरिक ॲसिड येईल नियंत्रणात; घरच्या घरी करा 'हा' साधा सोपा उपाय

Last Updated:

Black Ginger Tea for Uric Acid: शरीरातील युरिक ॲसिडची पातळी कमी करण्यासाठी आल्याचे सेवन फायदेशीर ठरते. आल्यामध्ये दाहक-विरोधी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. जे सांधेदुखी आणि सूज कमी करण्यास मदत करतात.

Uric Acid Home Remedies: ‘या’ चहाने युरिक ॲसिड येईल नियंत्रणात; घरच्या घरी करा 'हा' साधा सोपा उपाय
Uric Acid Home Remedies: ‘या’ चहाने युरिक ॲसिड येईल नियंत्रणात; घरच्या घरी करा 'हा' साधा सोपा उपाय
Uric Acid Home Remedies: अनेक लोकांना चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयींमुळे युरिक ॲसिडचा त्रास सुरू होतो. शरीरात युरिक ॲसिडचे प्रमाण वाढल्यास सांधेदुखी, टाचदुखी आणि आरोग्यासंबंधित अन्य समस्यांना सामोरे जावे लागते. युरिक ॲसिड हा शरीरात एक टाकाऊ पदार्थ असतो, जो प्युरीन नावाच्या रसायनाच्या विघटनाने तयार होतो. घाण किंवा टाकाऊ पदार्थ किडनी फिल्टर करून शरीराबाहेर टाकते. पण जेव्हा किडनी नीट काम करत नाही, तेव्हा ते सांध्याभोवती क्रिस्टल्सच्या स्वरूपात जमा होऊ लागते. शरीरात युरिक ॲसिडचे प्रमाण वाढल्यामुळे सांधे दुखणे, सूज येणे, चालताना पाय दुखणे असे त्रास सुरू होतात.
अशावेळी युरिक ॲसिडवर नियंत्रण ठेवणे खूप महत्त्वाचे असते. शरीरातील युरिक ॲसिडची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी तुम्हाला आहार आणि जीवनशैली बदल केले पाहिजे. याशिवाय काही घरगुती उपायांनीही युरिक ॲसिडवर नियंत्रण ठेवता येते. तुम्ही पीत असलेल्या चहामध्ये एक छोटासा पदार्थ टाकल्यानंतर तुम्ही युरिक ॲसिडवर नियंत्रण मिळवू शकता.
advertisement
शरीरातील युरिक ॲसिडची पातळी कमी करण्यासाठी आल्याचे सेवन फायदेशीर ठरते. आल्यामध्ये दाहक-विरोधी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. जे सांधेदुखी आणि सूज कमी करण्यास मदत करतात. याशिवाय, शरीरातील वाढलेलं युरिक ॲसिड कमी करण्यास देखील आलं मदत करते. आल्याच्या सेवनाने शरीरातील टॉक्सिन्स आणि प्युरिन काढून टाकण्यास मदत होते. आल्याच्या नियमित सेवनाने युरिक ॲसिडच्या लक्षणांपासून आराम मिळू शकतो.
advertisement
आल्याचे सेवन कसे करावे?
युरिक ॲसिडची पातळी नियंत्रित करण्यासाठी तुम्ही आल्याच्या चह्याचे सेवन करू शकता. यासाठी कढईतदोन कप पाणी गरम करा. एक इंच आले ठेचून त्यात घाला. पाण्याला चांगली उकळी आली की ग्लासमध्ये गाळून घ्या. नियमितपणे सकाळी रिकाम्या पोटी आल्याचा चहा घेतल्यास युरिक ॲसिड नियंत्रित ठेवण्यास मदत होते. याशिवाय हिवाळ्यात आल्याचा चहा पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Uric Acid Home Remedies: ‘या’ चहाने युरिक ॲसिड येईल नियंत्रणात; घरच्या घरी करा 'हा' साधा सोपा उपाय
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement