advertisement

अशोक खरात प्रकरणात नवा ट्विस्ट, चाकणकरांनंतर माजी मंत्र्याचं कनेक्शन उघड, निकटवर्तीला पोलिसांनी उचललं

Last Updated:

नाशिकमधील स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ आणि 'कॅप्टन' अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांची अनेक प्रकरणं आता समोर येऊ लागली आहेत. आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला असून माजी मंत्र्याचं कनेक्शन उघड झालं आहे.

ashok kharat and deepak londhe
ashok kharat and deepak londhe
लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी नाशिक: नाशिकमधील स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ आणि 'कॅप्टन' अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांची अनेक प्रकरणं आता समोर येऊ लागली आहेत. अशोक खरात याच्यासाठी छत्री पकडल्याचा आणि पाय धुतल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागला आहे. त्यांच्यावर विविध स्तरातून टीका होत आहे.
एकीकडे चाकणकर यांनी राजीनामा दिल्यानंतर आता माजी मंत्र्याचं कनेक्शन समोर आलं आहे. पोलिसांनी माजी मंत्र्याच्या एका निकटवर्तीयाला उचललं आहे. पोलिसांकडून त्याची कसून चौकशी सुरू आहे.
दीपक लोंढे असं चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचं नाव आहे. तो शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री दीपक केसरकर यांचे निकटवर्तीय मानले जातात. आरोपी अशोक खरात याने नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी बेहिशोबी माया जमवली आहेत. या जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारात दीपक लोंढे याने मदत केल्याचा संशय पोलिसांना आहे. आता पोलिसांनी चौकशीसाठी दीपक लोंढेला ताब्यात घेतलं आहे. त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
advertisement

कोण आहे दीपक लोंढे?

दीपक लोंढे हा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर परिसरात जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवसायात अत्यंत सक्रिय एजंट आहेत. माजी मंत्री दीपक केसरकर यांच्याशी त्याचे अत्यंत जवळचे संबंध असल्याची चर्चा आहे. अशोक खरात याच्याशी असलेल्या व्यावसायिक आर्थिक व्यवहारांच्या संशयावरून लोंढे याला चौकशीसाठी पाचारण करण्यात आलं.

SIT चौकशीचा रोख काय?

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरातने जमवलेल्या अफाट मालमत्तेत आणि त्याच्या संशयास्पद जमिनींच्या व्यवहारात दीपक लोंढेचा काही सहभाग आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत. एसआयटीच्या पथकाने लोंढेची अनेक तास चौकशी केली. खरातच्या आर्थिक साम्राज्याबद्दल अनेक महत्त्वाचे प्रश्न त्याला विचारण्यात आले.
advertisement

राजकीय आणि व्यावसायिक भागीदार रडारवर

दीपक लोंढे याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आता पोलीस अशोक खरातच्या इतर राजकीय आणि व्यावसायिक भागीदारांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. खरातने 'न्युमरोलॉजिस्ट' बनून नाशिकमधील अनेक बड्या धेंडांना आपल्या जाळ्यात ओढलं होतं. यापैकी कोणाकोणाचे खरातसोबत आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत का? याचा तपास आता एसआयटी तयार करत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
अशोक खरात प्रकरणात नवा ट्विस्ट, चाकणकरांनंतर माजी मंत्र्याचं कनेक्शन उघड, निकटवर्तीला पोलिसांनी उचललं
Next Article
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त, जाणून घ्या नवे दर
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त
  • लठ्ठपणा आणि मधुमेहावर आता स्वस्त उपचार

  • किमतीत ६० टक्क्यांपर्यंत मोठी घट होणार

  • जाणून घ्या किती स्वस्त मिळणार औषध

View All
advertisement