TRENDING:

मुंबईतील असं ठिकाण, जिथे फक्त 3 रुपयांपासून मिळतायेत कंदील, खरेदीसाठी बेस्ट मार्केट

Last Updated:

diwali shopping in mumbai - यंदा अगदी स्वस्त दरात चांगल्या प्रतीचा कंदील खरेदी करायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. मुंबईत अगदी स्वस्त दरात कंदील कुठे मिळतो, हेच आपण जाणून घेऊयात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रतिकेश पाटील, प्रतिनिधी
advertisement

मुंबई - नवरात्री, दसऱ्यानंतर आता दिवाळीचे वेध लागले आहेत. बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. दिवाळी म्हटल्यावर सर्वात आधी कंदील खरेदीचा विषय समोर येतो. तुम्हालाही यंदा अगदी स्वस्त दरात चांगल्या प्रतीचा कंदील खरेदी करायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. मुंबईत अगदी स्वस्त दरात कंदील कुठे मिळतो, हेच आपण जाणून घेऊयात.

advertisement

अवघ्या काही दिवसांवर दिवाळी आली आहे. दिवाळी म्हणजे सर्वच गटातील लोकांसाठी आनंद साजरा करण्याचा आणि वाटण्याचा सोहळा असतो. दिवाळीच्या आधी दिवाळीची जोरदार खरेदी केली जाते. दिवाळीसाठी केवळ कपडे नाही तर आकाश कंदीलही मोठ्या प्रमाणात खरेदी केले जातात.

मुंबईतील मस्जिद बंदर मार्केटला अगदी 3 रुपयांपासून होलसेल घरात कंदील भेटतात. होलसेल बाजारात कंदील 3 रुपयापासून ते 10 रुपयांपर्यंत तसेच 70 रुपयापर्यंत कंदील या बाजारात पाहायला मिळतात. याचबरोबर इतर बाजारामध्ये 120 रुपयाला मिळणारा करंजी कंदील या मार्केटमध्ये 40 रुपयाला मिळतो. त्याच कंदीलचा सहाचा बंच 230 रुपयापर्यंत मिळतो.

advertisement

SIP सुरू करण्यासाठी कोणती तारीख निवडावी, पेमेंट वेळेत झालं नाही तर..?, तज्ज्ञांनी दिली तुमच्या प्रश्नांची उत्तरं

याचबरोबर 40 रुपयांपासून ते 220 रुपयापर्यंत तुम्हाला कंदील या बाजारात अगदी स्वस्त दरात कंदील मिळतील. मस्जिद बंदर मार्केटमध्ये तुम्हाला रिटेलमध्ये अगदी 6 रुपयापासून ते 40 रुपयांपर्यंत हे कंदील मिळतील. जर तुम्हाला नवनवीन डिझाईन असणारे कंदील अगदी स्वस्तात हवे असतील तर तुम्ही याठिकाणी नक्की भेट देऊ शकतात.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
मुंबईतील असं ठिकाण, जिथे फक्त 3 रुपयांपासून मिळतायेत कंदील, खरेदीसाठी बेस्ट मार्केट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल