कोलेजन हे एक प्रकारचे स्ट्रक्चरल प्रोटीन आहे जे त्वचेचा 75 ते 80 टक्के भाग तयार करतं. कोलेजनमुळे त्वचा तरुण दिसते, त्वचा घट्ट आणि सुंदर दिसते. त्वचेव्यतिरिक्त, स्नायू आणि हाडांनाही ताकदीसाठी कोलेजनची आवश्यकता असते. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी कोलेजनची आवश्यकता असते. नैसर्गिकरित्या कोलेजन वाढवण्यासाठी आयुर्वेदिक औषधी वनस्पती उपयुक्त ठरतात.
Skin Care : चेहऱ्यावर मध लावावा का ? मध चेहऱ्यासाठी फायदेशीर आहे का ? वाचा त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला
advertisement
पाहूयात या औषधी वनस्पती -
गोटुकोला - गोटुकोला किंवा मांडुकपर्णी वनस्पती आहे. टाइप 1 आणि टाइप 3 कोलेजन यामुळे सुधारतं. जखमा भरून काढण्यासाठी आणि ऊतींच्या पुनरुत्पादनात देखील हा उपाय प्रभावी आहे.
आवळा - आवळ्यातलं व्हिटॅमिन सी कोलेजन वाढवण्यास मदत करतं. कोलेजन क्रॉस लिंकिंगसाठी व्हिटॅमिन सी आवश्यक आहे.
ज्येष्ठमध - ऊतींना बरं करण्यासाठी, दुखापत बरी करण्यासाठी आणि कोलेजन टिकवून ठेवण्यासाठी ज्येष्ठमध उपयुक्त आहे.
अश्वगंधा - अश्वगंधामुळे तणाव कमी करण्यासाठी मदत होते. यामुळे कोर्टिसोल कमी होतं आणि कोर्टिसोलमुळे होणाऱ्या कोलेजनच्या नुकसानापासून त्वचेचं संरक्षण होतं.
Bruise : काळ्या निळ्या डागावर हा उपाय नक्की करा, वेदना होईल कमी, डागही होईल नाहिसा
सुकामेवा आणि बिया - सुकामेवा आणि बियांमधे (सूर्यफुलाच्या बिया इ.) जस्त आणि व्हिटॅमिन ई असतं, यामुळे कोलेजन उत्पादन सुधारतं.
शतावरी - शतावरी या रसायनामुळे त्वचेला चांगलं पोषण मिळतं. त्वचेची लवचिकता वाढते आणि कोलेजन वाढतं.
या आयुर्वेदिक औषधांच्या वापरासाठीही डॉक्टरांनी माहिती दिली आहे. या आयुर्वेदिक जिन्नसांची पावडर करून दिवसातून एकदा एक चमचा घेता येतो. एक ते तीन महिने रिकाम्या पोटी ही पावडर खाल्ल्यानं कोलेजन वाढवण्यात फायदा होतो.