TRENDING:

केसगळती वाढली, पिंपल येतात? असू शकतो PCOS/PCOD चा धोका, पाहा काय आहे नेमका आजार

Last Updated:

What is PCOS/PCOD: महिलांमध्ये एक सामान्य आरोग्य समस्या म्हणून PCOS आणि PCOD यांचा उल्लेख वारंवार ऐकायला मिळतो. पण नक्की ही समस्या काय आहे?

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आजकाल महिलांमध्ये एक सामान्य आरोग्य समस्या म्हणून PCOS आणि PCOD यांचा उल्लेख वारंवार ऐकायला मिळतो. विशेषतः वय वर्षे १८ ते ३५ या वयोगटातील महिलांमध्ये या आजाराचे प्रमाण झपाट्याने वाढताना दिसत आहे. पण नक्की ही समस्या काय आहे? ती कशी ओळखायची? आणि ती का होते? हे सोप्या भाषेत समजून घेऊया.
महिलांमध्ये एक सामान्य आरोग्य समस्या म्हणून PCOS आणि PCOD यांचा उल्लेख वारंवार ऐकायला मिळतो. पण नक्की ही समस्या काय आहे?
महिलांमध्ये एक सामान्य आरोग्य समस्या म्हणून PCOS आणि PCOD यांचा उल्लेख वारंवार ऐकायला मिळतो. पण नक्की ही समस्या काय आहे?
advertisement

PCOS आणि PCOD म्हणजे काय?

PCOS म्हणजे Polycystic Ovary Syndrome आणि PCOD म्हणजे Polycystic Ovarian Disease. या दोन्हीही अंडाशयांशी (Ovaries) संबंधित विकार आहेत. अंडाशय म्हणजे स्त्रियांच्या प्रजनन संस्थेतील एक महत्त्वाचा भाग, जिथे अंड तयार होतात आणि हार्मोन्सचे संतुलन राखले जातं.

PCOD मध्ये अंडाशयांमध्ये अनेक लहानसहान गाठी (सिस्ट्स) तयार होतात. यामुळे हार्मोन्सचे संतुलन बिघडते आणि मासिक पाळी अनियमित होते.

advertisement

What is IVF : आयव्हीएफ म्हणजे काय? शारिरीक संबंधांशिवाय कशी होते गर्भधारणा? सविस्तर जाणून घ्या

PCOS हा थोडा गंभीर प्रकार आहे. यात हार्मोन्समध्ये असंतुलन जास्त वाढते, अंडाशयात सिस्ट्स तयार होतात, आणि शरीरात अँड्रोजेन्स (पुरुष हार्मोन्स) वाढतात. याचा थेट परिणाम फर्टिलिटी वर होऊ शकतो.

PCOS/PCOD होण्याची कारणे

advertisement

  • हार्मोनल असंतुलन: ही समस्या वाढू लागल्यास शरीरात पुरुष हार्मोन (अँड्रोजेन्स) जास्त प्रमाणात निर्माण होतो.
  • इन्सुलिन रेझिस्टन्स: यावेळी शरीर इन्सुलिन हार्मोनला योग्य प्रतिसाद देत नाही, त्यामुळे शरीरातील साखरेची पातळी वाढते आणि वजनही वाढू शकते.
  • जीन्सचा प्रभाव: जर कुटुंबात इतर महिलांनाही ही समस्या असेल, तर तुम्हालाही ही समस्या होण्याची शक्यता वाढते.
  • advertisement

  • जास्त ताणतणाव आणि चुकीची जीवनशैली: व्यायामाचा अभाव, चुकीची आहारपद्धती आणि मानसिक तणाव या गोष्टीही कारणीभूत ठरतात.

PCOS/PCOD ची लक्षणे

  • मासिक पाळी अनियमित होणे किंवा पूर्णपणे थांबणे.
  • चेहऱ्यावर किंवा शरीरावर अनावश्यक केस वाढणे. (Hirsutism)
  • वजन वाढणे किंवा वजन कमी होण्यात अडचण येणे.
  • चेहऱ्यावरील मुरुमे (Acne) वाढणे.
  • advertisement

  • केस गळणे किंवा टक्कल पडण्यासारखी स्थिती.
  • गर्भधारणेत अडचणी येणे.
  • त्वचा काळसर पडणे (विशेषतः गळ्याच्या किंवा काखेच्या भागात)

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अशीही आरोग्य सेवा, रक्तदान आणि अवयवदानासाठी काम करणारे अमित, Video पाहुन कराल कौतुक
सर्व पहा

PCOS किंवा PCOD ही एक आयुष्यभराची समस्या असू शकते, पण योग्य आहार, नियमित व्यायाम, तणावमुक्त जीवनशैली आणि वेळेवर उपचार यांच्यामुळे ती नियंत्रित करता येते. या समस्येची सुरुवातीला लक्षणे ओळखणे आणि तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप गरजेचे आहे.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
केसगळती वाढली, पिंपल येतात? असू शकतो PCOS/PCOD चा धोका, पाहा काय आहे नेमका आजार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल