What is IVF : आयव्हीएफ म्हणजे काय? शारिरीक संबंधांशिवाय कशी होते गर्भधारणा? सविस्तर जाणून घ्या
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
IVF तंत्रज्ञानामुळे वंध्यत्वाचा सामना करणाऱ्या दाम्पत्यांसाठी गर्भधारण शक्य झाली आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे कुटुंबाचे स्वप्न साकार होऊ शकते.
वंध्यत्वाचा सामना करणाऱ्या दाम्पत्यांसाठी आणि विविध आरोग्य समस्यांमुळे नैसर्गिकरित्या गर्भधारणा न होणाऱ्या महिलांसाठी सध्या टेस्ट ट्यूब बेबी म्हणजेच इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF) हा एक मोठा आशेचा किरण ठरत आहे. आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या मदतीने आज गर्भधारणा सहज शक्य झाली आहे आणि त्यामुळे मूल होण्यात अडचणी येणाऱ्या कुटुंबाचे स्वप्न साकार होणे शक्य होत आहे.
advertisement
advertisement
या प्रक्रियेत, स्त्रीच्या शरीराबाहेर, म्हणजेच लॅबमध्ये, अंड आणि शुक्राणू एकत्र आणले जातात आणि फर्टिलायझेशन (Fertilization) घडवून आणले जाते. साधारणतः दोन ते तीन आठवड्यांमध्ये हा संपूर्ण टप्पा पूर्ण होतो. त्यानंतर तयार झालेले भ्रूण (Embryo) सूक्ष्म प्लास्टिक ट्यूबच्या साहाय्याने थेट महिलेच्या गर्भाशयात (Uterus) प्रत्यारोपित केले जाते.
advertisement
advertisement
या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारच्या मोठ्या शस्त्रक्रिया (Operation) अथवा दीर्घकालीन हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता नसते. यामुळे घरकाम असो किंवा ऑफिस वर्क, महिला आपल्या दैनंदिन कामांमध्येही सहज सहभागी राहू शकतात. जर परिस्थिती नॉर्मल असेल तर गर्भधारणेच्या सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये विशेष बेड रेस्टची गरज नसते.
advertisement


