ही मिठाई म्हणजेच बर्फी बनवण्यासाठी तुम्हाला वेळ तर कमी लागतोच. पण यासाठी तुम्हाला साहित्यही कमी लागतं. ही मिठाई बनवण्यासाठी तुम्हाला कंडेन्स्ड मिल्क आणि मिल्क पावडर लागते. या दोन पदार्थांपासूनच तुम्ही ही बर्फी बनवू शकता. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यावरून ड्राय फ्रुट्स आणि वेलचीपूड टाकू शकता.
अशी बनवा इन्स्टंट बर्फी..
advertisement
- सर्वात आधी कंडेन्स्ड मिल्कचा 1 डबा घ्या आणि त्यामध्ये 4 कप मिल्क पावडर टाका.
- कंडेन्स्ड मिल्कमुळे बर्फीला गोड आणि क्रीमी टेक्शचर येतं. त्याचप्रमाणे मिल्क पावडरमुळे बर्फी घट्टहोते.
- कंडेन्स्ड मिल्कमध्ये हळूहळू मिल्क पावडर मिक्स करून पूर्णपणे एकजीव करून घ्या.
- याचा घट्टसर गोळा बनवून घ्या आणि यामध्ये गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्या.
- तुम्हाला या सध्या बर्फीला शाही चव द्यायची असेल तर त्यात ड्राय फ्रुट्स आणि वेलची पूड घाला.
- तुम्ही यामध्ये केशराच्या काही काड्यादेखील घालू शकता. यानेही बर्फीला छान रंग येतो.
- एक प्लेट किंवा कोणतेही चौकोनी भांडे घ्या आणि त्याला थोडे तूप लावा.
- आता बर्फीचा गोळा या या भांड्यात एकसारखा पसरवा.
- यानंतर हे भांडं फक्त 30-40 सेकंदांसाठी मायक्रोवेव्हमध्ये ठेवा.
- या स्टेपमुळे बर्फी खूप लवकर सेट होण्यास मदत होईल.
या बर्फीमध्ये तुम्ही वरूनही बारीक चिरलेले बदाम, पिस्ते किंवा काजू टाकून सजवू शकता. तुमची इच्छा असल्यास तुम्ही बर्फीवर चांदीचा वर्खही लावू शकता. यामुळे ती मिठाई आणखी सुंदर दिसेल.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
