बहुतेक लोकांना फ्लश टँकमध्ये दोन बटणे का असतात हे माहित नसते. काही लोक दोन्ही बटणे एकाच वेळी दाबतात. असे केल्याने पाण्याचा अपव्यय होतो का? आजकाल बाजारात अनेक प्रकारचे कमोड्स आणि टॉयलेट फ्लश उपलब्ध आहेत. काहींना फक्त एक तर काहींना दोन बटणं असतात. काही वर्षांपूर्वी टॉयलेट फ्लशमध्ये एकच बटण दिले जात होते, मात्र आता तसे नाही. हळूहळू तंत्रज्ञान बदलले आणि फ्लश टँकची रचनाही बदलली. वास्तविक, फ्लश टँकवर अशी दोन बटणे दिलेली नाहीत. ही दोन्ही बटणे वेगवेगळ्या प्रकारे काम करतात. याचा थेट संबंध पाणी बचतीशी आहे.
advertisement
कोणता एसी जास्त फायदेशीर 3, 4 की 5 स्टार? बिल कमी करायचं असेल या गोष्टी तपासा
फ्लॅश टॅन्कला 2 वेगळी बटणं का असतात?
शौचालयाचा वापर करताना पाण्याचा काटकसरीने वापर व्हावा आणि पाण्याचा अपव्यय होऊ नये, हे लक्षात घेऊन या उपाययोजना केल्या जात आहेत. जेव्हा तुम्ही मोठे बटण दाबता तेव्हा ते प्रति फ्लश 6-7 लिटर पाणी वापरते. लहान बटण दाबल्यास कमी पाणी बाहेर येते. एक लहान बटण दाबल्यास 3-4 लिटर पाणी लागते. कधीकधी पाणी सोडण्याची क्षमता फ्लश टॅन्कच्या आकारावरही अवलंबून असते. जर टाकी मोठी असेल तर दोन्ही बटनांमधून पाणी वेगवेगळ्या प्रमाणात बाहेर येईल.
दोन्हीचे काम आहे वेगळे..
लहान बटण पाणी वाचवते. जर तुम्ही लघवीसाठी टॉयलेट वापरले तर तुम्ही लहान बटण दाबावे. द्रव कचरा फ्लश करण्यासाठी आपण एक लहान बटण दाबावे. त्याच वेळी, शौच केल्यानंतर, कमोडमधील घनकचरा फ्लश करण्यासाठी मोठे बटण दाबले पाहिजे. कारण त्यासाठी जास्त पाणी लागते. मूत्र फ्लश करण्यासाठी कमी पाणी आवश्यक लागते म्हणून एक लहान बटण तिथे दिले जाते.
सिंगल फ्लश टॉयलेटही वापरू शकता..
सिंगल फ्लश टॉयलेट हे ड्युअल फ्लश टॉयलेटपेक्षा खूपच स्वस्त आहे, त्यामुळे आजही ते अनेक घरांमध्ये, शाळा, कॉलेजेस, ऑफिसमध्ये पाहायला मिळते.
बसून की झोपून कसं चेक करावं ब्लड प्रेशर? 99% लोकांना माहित नाही परफेक्ट पद्धत
दोन्ही बटणं एकत्र दाबल्यास काय होते?
अनेक वेळा दोन्ही बटणे घाईघाईने दाबली जातात. काही लोकांना असे वाटते की, दोन्ही बटणं दाबल्यास जास्त पाणी बाहेर येईल आणि शौचालयातील घाण एकाच वेळी पूर्णपणे स्वच्छ होईल परंतु तसे होत नाही. दोन्ही बटणे दाबल्याने फ्लश टाकी पूर्णपणे रिकामी होईल. परंतु याचा अर्थ फ्लश टॅन्कच्या क्षमतेपेक्षा जास्त पाणी बाहेर येईल असे नाही. जर तुम्हाला बटणं खराब होऊ द्यायची नसतील तर एकावेळी एकच बटण दाबा. ड्युअल फ्लश टॉयलेटमध्ये, फ्लश टॅन्कमधील तंत्रज्ञान वेगळ्या पद्धतीने काम करते. पाणी बाहेर पडण्यासाठी एक्झिट व्हॉल्व्ह असतो, जर ते खराब झाले तर त्याची किंमत सिंगल फ्लश टॉयलेटपेक्षाही जास्त असते.