Blood Pressure : बसून की झोपून कसं चेक करावं ब्लड प्रेशर? 99% लोकांना माहित नाही परफेक्ट पद्धत
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
हल्ली बरेचसे चेकअप आपण घरीच काही उपकरणांच्या साहाय्याने करू शकतो. उदा. रक्तातील साखरेचे प्रमाण घरी तपासणे, बीपी चेक करणे. तपासण्या घरी करता येत असल्या तरी त्याची योग्य पद्धत माहित असणंही आवश्यक आहे.
मुंबई : हल्ली आधुनिकीकरणामुळे सर्व गोष्टी सोप्या झाल्या आहेत. पूर्वी आरोग्याच्या कोणत्याही तपासणीसाठी रुग्णालयात जावे लागायचे. मात्र हल्ली बरेचसे चेकअप आपण घरीच काही उपकरणांच्या साहाय्याने करू शकतो. उदा. रक्तातील साखरेचे प्रमाण घरी तपासणे, बीपी चेक करणे. तपासण्या घरी करता येत असल्या तरी त्याची योग्य पद्धत माहित असणंही आवश्यक आहे. अन्यथा चुकीचे रिझल्ट्स तुम्हाला मिळतात आणि आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.
हल्ली डायबिटीजसह रक्तदाबाची समस्या वाढत आहे. करोडो लोकांना उच्च रक्तदाब किंवा कमी रक्तदाबाचा सामना करावा लागतो. तरुणांनामधेही हा त्रास वाढलाय. डिजिटल ब्लड प्रेशर तपासणारी मशिन बाजारात उपलब्ध असल्यामुळे लोक घरबसल्याही त्यांचे बीपी सहज तपासू शकतात. अनेकदा लोक झोपून किंवा बेडवर बसून बीपी तपासतात. मात्र तज्ञांच्या मते, बीपी तपासण्याची योग्य पद्धत असावी, अन्यथा रक्तदाबाचे अचूक रिडींग मिळत नाही.
advertisement
नवी दिल्ली सर गंगा राम हॉस्पिटल येथील प्रिव्हेंटिव्ह हेल्थ अँड वेलनेस विभागाच्या संचालक, डॉ. सोनिया रावत यांनी सांगितले की, प्रौढांचा सामान्य रक्तदाब 120/80 मिमी एचजी असतो. सिस्टोलिक दाब 120 मिमी एचजी पर्यंत आणि डायस्टोलिक दाब 80 मिमी एचजी पर्यंत असावा. यापेक्षा जास्त किंवा कमी असल्यास उच्च आणि कमी रक्तदाबाची समस्या सुरू होते. आजच्या युगात बिघडलेली जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे बीपीची समस्या झपाट्याने वाढत आहे. बीपीची समस्या टाळण्यासाठी प्रत्येकाने आपला रक्तदाब तपासत रहावा आणि तो कमी-जास्त झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
advertisement
डॉक्टर सोनिया रावत सांगतात की, ब्लडप्रेशर तपासताना लोकांनी आरामात खुर्चीवर बसावे. खुर्चीवर बसताना तुमचे पाय जमिनीवर असले पाहिजेत आणि तुमचे हात तुमच्या समोरच्या टेबलावर हृदयाच्या समोर इतक्या उंचीवर असावेत. तुम्ही उजव्या किंवा डाव्या हाताने बीपी तपासू शकता. काही वेळ या स्थितीत बसल्यानंतर तुम्ही तुमचा रक्तदाब तपासावा. याच्या मदतीने तुम्हाला बीपीचे अचूक रीडिंग मिळेल. मात्र, ज्या लोकांना चक्कर येते, त्यांचा रक्तदाब झोपूनही तपासला जाऊ शकतो. याचा रिडींगवर विशेष परिणाम होत नाही.
advertisement
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, जर तुम्ही झोपून तुमचा रक्तदाब तपासलात तर तुम्हाला बसण्याच्या तुलनेत थोडे कमी रिडींग मिळेल. त्यामुळे योग्य रिडींगसाठी लोकांनी खुर्चीवर बसून बीपी नीट तपासावा. व्यक्ती चुकीच्या स्थितीत असेल तर, बीपी रीडिंगमध्ये थोडासा बदल होऊ शकतो. रक्तदाबाची समस्या टाळण्यासाठी लोकांनी चांगली जीवनशैली अंगीकारावी, सकस आहार घ्यावा आणि नियमित व्यायाम करावा. याशिवाय वेळोवेळी बीपी तपासून डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
advertisement
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 01, 2024 11:21 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Blood Pressure : बसून की झोपून कसं चेक करावं ब्लड प्रेशर? 99% लोकांना माहित नाही परफेक्ट पद्धत








