advertisement

Summer Health Tips : शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी बेस्ट आहेत 'हे' 10 घरगुती उपाय..

Last Updated:
आता तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. त्यामुळे उष्णतेपासून बचाव करणं खूप आवश्यक आहे. घामाच्या धारा आणि वाढत्या उष्णतेचा लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच खूप त्रास होतो. योग्यवेळी उपाय न केल्यास आपल्याला डिहायड्रेशनसह अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे आम्ही तुम्हाला असे 10 घरगुती उपाय सांगणार आहोत जे केल्यानं तुमचा त्रास कमी होईल.
1/10
आहारात दूध, दही, तुपाचं सेवन करावं. तुपाचा गुणधर्म थंड असल्यानं पोटात थंडावा आणि उष्णता कमी करण्यास मदत करतं. ताक घेताना त्यात पुदिना, धणे-जीरे पूड, हिंग घालून घेतल्यानं अधिक फायदा होतो.
आहारात दूध, दही, तुपाचं सेवन करावं. तुपाचा गुणधर्म थंड असल्यानं पोटात थंडावा आणि उष्णता कमी करण्यास मदत करतं. ताक घेताना त्यात पुदिना, धणे-जीरे पूड, हिंग घालून घेतल्यानं अधिक फायदा होतो.
advertisement
2/10
रोज रात्री तळपाय, हाताला तेल लावून काशाच्या वाटीनं पाय घासावेत, यामुळे झोप शांत लागते. हाता-पायाची उष्णतेनं होणारी जळजळही कमी होते.
रोज रात्री तळपाय, हाताला तेल लावून काशाच्या वाटीनं पाय घासावेत, यामुळे झोप शांत लागते. हाता-पायाची उष्णतेनं होणारी जळजळही कमी होते.
advertisement
3/10
जळवात होत असेल तर रक्त चंदनाचा लेप उगाळून लावावा. रक्त चंदन उगाळून पाण्यातून घेतल्यानंही त्याचा फायदा होतो.
जळवात होत असेल तर रक्त चंदनाचा लेप उगाळून लावावा. रक्त चंदन उगाळून पाण्यातून घेतल्यानंही त्याचा फायदा होतो.
advertisement
4/10
रोज शक्य असेल तर दूध, सरबत किंवा साध्या पाण्यातून 1 चमचा सब्जा अथवा तुळशीचं बी घ्यावं. यासोबत रोज सकाळी गुलकंद खाल्ला तर उत्तम.
रोज शक्य असेल तर दूध, सरबत किंवा साध्या पाण्यातून 1 चमचा सब्जा अथवा तुळशीचं बी घ्यावं. यासोबत रोज सकाळी गुलकंद खाल्ला तर उत्तम.
advertisement
5/10
रोज सकाळी नुसतं लिंबूपाणी प्यायल्यानं शरीरातील नको असलेले टॉक्सिन्स निघून जातात. मात्र हे सुरू केल्यानंतर चहा-कॉफी घेणं टाळावं.
रोज सकाळी नुसतं लिंबूपाणी प्यायल्यानं शरीरातील नको असलेले टॉक्सिन्स निघून जातात. मात्र हे सुरू केल्यानंतर चहा-कॉफी घेणं टाळावं.
advertisement
6/10
 <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/benefits-of-eating-ice-apple-tadgole-in-summer-keep-body-hydrated-keep-boost-immunity-mhpp-1167137.html">फळ</a>, फळभाज्या यांचा आहारात जास्त वापर करावा. याशिवाय उन्हाळ्यात जेवणाच्या वेळा पाळाव्यात. शक्यतो रात्री उशिरा जेवणं टाळावं.
फळ, फळभाज्या यांचा आहारात जास्त वापर करावा. याशिवाय उन्हाळ्यात जेवणाच्या वेळा पाळाव्यात. शक्यतो रात्री उशिरा जेवणं टाळावं.
advertisement
7/10
 आहारात पेज किंवा शक्यतो <a href="https://news18marathi.com/lifestyle/summer-tips-special-way-to-eat-cucumber-in-summer-cucumber-benefits-in-summer-mhpj-1169615.html">हलका आहार</a> घ्यावा. अति तेलकट, तिखट, फास्टफूडसारखे पदार्थ टाळावेत ज्यामुळे पित्त, अपचन, गॅसचा त्रास होण्याची शक्यता असते.
आहारात पेज किंवा शक्यतो हलका आहार घ्यावा. अति तेलकट, तिखट, फास्टफूडसारखे पदार्थ टाळावेत ज्यामुळे पित्त, अपचन, गॅसचा त्रास होण्याची शक्यता असते.
advertisement
8/10
पित्तासाठी आमसुलाची कढी, आमसूल पाण्यात घालून घ्यावं. सोलकढी, कोकम साखरेत घालून ते रोज एक चमचा खाल्ल्यानंही त्रास कमी होतो.
पित्तासाठी आमसुलाची कढी, आमसूल पाण्यात घालून घ्यावं. सोलकढी, कोकम साखरेत घालून ते रोज एक चमचा खाल्ल्यानंही त्रास कमी होतो.
advertisement
9/10
नाचणी थंड असल्यानं आंबिल, नाचणी, तांदळाची भाकरी किंवा नाचणीची उकड ताकामधून घ्यावी.
नाचणी थंड असल्यानं आंबिल, नाचणी, तांदळाची भाकरी किंवा नाचणीची उकड ताकामधून घ्यावी.
advertisement
10/10
उन्हाळ्यात भरपूर पाणी पिणं आवश्यक आहेच, मात्र नुसतं पाणी पिण्याऐवजी त्यासोबत ग्लुकॉन डी अथवा गूळ किंवा साखर खाल्यानं तहान शमते आणि ऊर्जाही मिळते. पाण्यात वाळा, साळीच्या लाह्या टाकून ते पाणी प्यावं.

सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement