या वर्षी कार खरेदी करताय? मग त्यात हे फीचर्स असायलाच हवेत, अन्यथा पैसे जातील वाया
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
तुम्हीही नवी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. कारण नव्या कारमध्ये पैसे खर्च करण्यापूर्वी त्यात काही फीचर्स असणे गरजेचे असते. हे कोणते फीचर्स आहेत पाहूया.
Car Buying Tips 2026: आपली स्वतःची कार नवी कोरी कार खरेदी करावा असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. तुमचंही हेच स्वप्न असेल आणि ते तुम्ही यावर्षी पूर्ण करण्याचा विचारत करताय का? असं असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण 2026 मध्ये नवी कार खरेदी करताना त्यात काही महत्त्वाची फीचर्स असणे खुप गरजेचं असतं. कारण आजच्या कार या वेगाने चालत्या-फिरत्या कंप्यूटर बनताय. ज्यामध्ये सेफ्टी, स्मार्ट टेक्नॉलॉजी आणि रोजच्या आयुष्यातील सुविधांची खुप काळजी घेतली जाते. अशावेळी कार निवडताना तुम्ही काही महत्त्वाचे फीचर्स त्यात आहेत ही नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे. ज्यामुळे तुमची ड्रायव्हिंग सुरक्षित, सोपी आणि फ्यूचर-रेडी होईल.
Level-2 ADAS
आजचा काळ हा मॉडर्न आहे. ज्यामुळे कारही मॉर्डन झाल्या आहेत. आता कारमध्ये Level-2 ADAS फीचर आहे. यात ऑटोमॅटिक इमर्जेंसी ब्रेकिंग, लेन-कीप असिस्ट आणि अडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोलसारख्या सिस्टमचा समावेश असतो. ही टेक्नॉलॉजी रस्त्यावरील धोका आधीच ओळखते. यासोबतच गरज पडल्यावर स्वतःच ब्रेक लावू शकते. हायवेवर पुढे चालत असलेल्या गाडीपासून दूर राहते आणइ कार आफल्या लेनमध्येच ठेवते. पहिले हे फीचर फक्त महागड्या गाड्यांमध्येच मिळायचे. पण आता फॅमिली सेफ्टीसाठी अवश्य ठरते.
advertisement
360-डिग्री कॅमेरा
भारतासारख्या गर्दीच्या शहरांमध्ये पार्किंग करणं सोपं नाही. ज्यामुळे 360-डिग्री कॅमेरा ही समस्या सहज सोडवू शकते. हे फीचर कारचा वरुन पूर्ण व्ह्यू दाखवते. ज्यामुले तुम्ही प्रत्येक दिशेला कोणता अडथळा आहे हे सहज पाहू शकता. ज्यामुळे तुम्हाला गर्दीत गाडी पार्क करणं सोपं होतं. रिव्हर्स करताना व्हिजिबिलिटी मिळते. स्क्रॅच आणि टक्कर होण्यापासून बचाव होतो.
advertisement
टचस्क्रीन आणि वायरलेस कनेक्टिव्हिटी
2026 मध्ये मोठी टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम आता आवश्यक फीचर बनलीये 10-इंच किंवा त्यापेक्षा मोठ्या स्क्रीनसह वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto मिळणं सामान्य झालंय. म्हणजेच आता केबल लावण्याची गरज नाही. तुमचा फोन लगेच कनेक्ट होतो. नेव्हिगेशन, कॉल आणि म्यूझिकचा सोपा अॅक्सेस मिळतो. ड्राइव्ह करताना कमी डिस्ट्रॅक्शन होतं. कार आणि स्मार्टफोनचं भारी कनेक्शन यामुळे साधता येतं.भारतातील उष्णता पाहता व्हेंटिलेटेड सीट्स आता लग्जरी नाही. तर गरज बनले आहेत. हे सीट्स हवा सर्कुलेट करते, ज्यामुळे लांबच्या प्रवास किंवा ट्रॅफिकमध्येही कूल आणि कंफर्टेबल वाटतं. एकदा याचा वापर केल्यास सामान्य सीटवर जाणं कठीण वाटू लागतं.
advertisement
सेफ्टी फीचर्स
आता कार खरेदी करताना सेफ्टी फीचर्सकडे लक्ष देणं गरजेचं असतं. याकडे तुम्ही दुर्लक्ष करू शकत नाही. 2026 च्या कारमध्ये बेसिक फीचर्स अवश्य असायला हवेत. यामध्ये किमान 6 एयरबॅग्स, ABS (एंटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम), ESC म्हणजेच इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल. हे सर्व फीचर्स मिळून अपघाताच्या वेळी तुमची सुरक्षा वाढवतात. यासोबतच कार कंट्रोलमध्ये ठेवण्यात मदत करतात.
advertisement
हे फीचर्सही वेगाने गरजेचे ठरताय
या 5 मोठ्या फीचर्स व्यतिरिक्त आणखी काही टेक्नॉलॉजीही वेगाने स्टँडर्ड बनतेय. जी तुमच्या कारला आणखी जास्त अडव्हान्स बनवते. यात एक आहे वायरलेस चार्जिंग पॅड, बिल्ट-इन डॅशकॅम, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल. OTA अपडेट्स, ज्यामुळे कार वेळेबरोबर आणखी चांगली होत राहते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 29, 2026 4:32 PM IST









