किती दिवसांचे आहे पॅकेज?
माता वैष्णवीने तपश्चर्या करून काही काळ घालवलेल्या ठिकाणांचा अनुभव घेण्यासाठी आणि अखेरीस त्या पवित्र गुहेचे दर्शन घेण्यासाठी हा प्रवास एक अद्भुत अनुभव देणारा ठरेल. हे संपूर्ण पॅकेज 4 रात्री आणि 5 दिवसांचे आहे. यात तुमचा प्रवास मुंबईतून सुरू होऊन कटरा, वैष्णोदेवीला जाऊन पुन्हा मुंबईत परत येईल. हे पॅकेज दर रविवारपासून सुरू होते.
advertisement
कसा असेल संपूर्ण प्रवास?
हा संपूर्ण प्रवास 3AC वर्गातून 4 प्रवाशांसाठी आहे. मुंबईतून 11:00 वाजता बांद्रा टर्मिनस (BDTS) रेल्वे स्टेशनवरून ट्रेन क्रमांक 12471 ने तुमचा प्रवास सुरू होईल आणि रात्रभर प्रवास केल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी 17:20 वाजता माता वैष्णोदेवी कटरा (SVDK) रेल्वे स्टेशनवर आगमन होईल. स्टेशनवर उतरल्यानंतर तुम्ही स्वतःच्या व्यवस्थेने हॉटेलमध्ये चेक-इन कराल. दुसऱ्या दिवशी मंगळवारी, हॉटेलमध्ये नाश्ता केल्यानंतर तुम्ही माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी प्रस्थान कराल आणि दर्शन घेऊन सायंकाळी परत हॉटेलवर विश्रांतीसाठी याल. हॉटेलमध्ये रात्रीचे जेवण घेऊन मुक्काम कराल.
परतीचा प्रवास
तिसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी नाश्त्यानंतर हॉटेलमधून चेक-आउट करून 09:55 वाजता ट्रेन क्रमांक 12472 ने मुंबईसाठी कटरा रेल्वे स्टेशनवरून परतीचा प्रवास सुरू होईल. हा रात्रभर प्रवास केल्यानंतर पाचव्या दिवशी, म्हणजेच गुरुवारी 16:10 वाजता तुम्ही बांद्रा टर्मिनस (BDTS) येथे पोहोचून गोड आठवणींसह यात्रेची सांगता होईल. रेल्वेतील भोजन दोन्ही बाजूंच्या प्रवासात स्वतःला करावे लागेल.
पॅकेजचा प्रतिव्यक्ती खर्च
हे पॅकेज 3AC चे असून व्यक्तींनी सोबत प्रवास केल्यास प्रतिव्यक्ती 14,250 रुपये खर्च येईल, तर तीन व्यक्तींनी सोबत प्रवास केल्यास हा खर्च प्रतिव्यक्ती 13,650 रुपये असेल. तुम्ही एकटे प्रवास करत असाल, तर त्यासाठी 18,050 रुपये शुल्क लागेल. 5 ते 11 वयोगटातील लहान मुलांसाठी बेडसह 11,750 रुपये आणि बेडशिवाय 11,350 रुपये शुल्क आकारले जाईल.
पॅकेचमध्ये काय समाविष्ट असेल?
या पॅकेजमध्ये परतीचे 3AC रेल्वे तिकीट भाडे, कटरा येथे 2 रात्री डिलक्स श्रेणीतील हॉटेलमध्ये मुक्काम, 2 दिवसांचा नाश्ता आणि 2 रात्रीचे जेवण, प्रवास विमा आणि जीएसटी शुल्क समाविष्ट आहे. मात्र, रेल्वे स्टेशन ते हॉटेल आणि हॉटेल ते रेल्वे स्टेशनपर्यंतचा प्रवास, कटरा येथील दर्शनासाठीचे वाहन भाडे, प्रवासादरम्यानचे रेल्वेमधील भोजन, सर्व प्रवेश तिकिटे/दर्शन तिकिटे आणि वैयक्तिक खर्चाची रक्कम पॅकेजमध्ये समाविष्ट नाही.
पॅकेज कसे बुक कराल?
या धार्मिक प्रवासासाठी बुकिंग करण्यासाठी तुम्ही इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या पर्यटन कार्यालयांशी संपर्क साधू शकता. मुंबई, पुणे, नागपूर किंवा कोल्हापूर येथील आयआयसीटीसी कार्यालयांत संपर्क साधावा लागेल. अधिक तपशिलांसाठी pallaviv.pole@irctc.com किंवा deowzt10@irctc.com या ईमेलवर संपर्क साधता येईल किंवा 8287931886 या क्रमांकावर कॉल, एसएमएस किंवा व्हॉट्सॲप देखील करू शकता.
