इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे नेमकं काय ?
काही वर्षांपूर्वी देवधर्म किंवा आधात्माचा एक भाग म्हणून अनेक जण उपवास करायचे. त्यामुळे इंटरमिटंट फास्टिंग हा एक सुद्धा एक प्रकारचा उपवास आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. मात्र अधात्मातल्या उपवासांपेक्षा हा उपवास वेगळा आहे. इंटरमिटंट फास्टिंग हा उपवासाचा असा प्रकार आहे की, या प्रकारच्या उपवासात तुम्ही काहीही खाऊ शकता. मात्र तुम्हाला ठराविक वेळेतच खायचं आहे आणि उरलेल्या वेळेत उपाशी राहायचं आहे. जसे आध्यात्मिक उपवासाचे अनेक प्रकार आहेत, तसेच प्रकार हे इंटरमिटंट फास्टिंगचे सुद्धा आहेत. इंटरमिटंट फास्टिंगमध्ये 14/10, 16/8 आणि 5/2 असे प्रकार आहेत. त्यापैकी, 16/8 हा प्रकार भलताच लोकप्रिय होतोय.
advertisement
काय आहे 16/8 इंटरमिटंट फास्टिंग
दिवसातल्या 24 तासांपैकी 16 तास तुम्हाला उपवास करायचा आहे किंवा उपाशी राहायचं आहे आणि उरलेल्या 8 तासांमध्ये तुम्ही खायचं आहे. या 8 तासात तुम्ही केव्हाही, काहीही खाऊ शकता. याच प्रमाणे 14/10 प्रकारात 14 तास उपाशी राहायचं आहे आणि उरलेल्या 10 तासात काहीही खाता येतं. 5/2 प्रकाराच्या नावावरून तुम्हाला असं वाटू शकतं की, 5 तास उपाशी राहून 2 तास खायचं आहे. असं दिवसातून 2 वेळा करायचं आहे तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात. मुळातच 5/2 या प्रकारात आठवड्यातून 5 दिवस खायचं आहे आणि 2 दिवस उपाशी राहायचं आहे. उपवासाचा किंवा इंटरमिटंट फास्टिंगचा हा एक कठिण प्रकार आहे. याशिवाय 5/2 प्रकारातला उपवास करताना सलग 2 दिवस उपाशी राहायचं नाहीये.
हे सुद्धा वाचा : Weight loss tips व्यायाम करूनही वजन कमी होत नाहीये; टाळा ‘या’ चुका
इंटरमिटंट फास्टिंगबाबत तज्ज्ञांचं मत काय ?
प्रसिद्ध यकृत तज्ज्ञ डॉ. एस.के. सरीन यांचा इंटरमिटंट फास्टिंगला विरोध आहे. त्यांच्यामते इंटरमिटंट फास्टिंग ही निरोगी जीवनशैली होऊ शकत नाही. यामुळे कमी वेळात वजन भलेही कमी होत असेल मात्र त्याचे दूरगामी परिणाम हे आरोग्यावर होऊ शकतात. त्यामुळे बराच काळ उपाशी राहून एकाचवेळी भरपेट खाण्याने नुकसान होऊ शकतं. त्यापेक्षा वेळेवर मर्यादित आहार घेणं हे केव्हाही फायद्याचं.
इंटरमिटंट फास्टिंगबाबत का धोक्याचं ?
इंटरमिटंट फास्टिंगचे काही नियम आहे. मात्र हे करताना अनेकजण बराचवेळ उपाशी राहतात. उदा. जे लोक 5/2 प्रकारतलं फास्टिंग करतात त्यात त्यांना असं वाटंत की सलग 2 दिवस काही खायचं नाही. मात्र हे चुकीचं आहे. सतत बराच वेळ उपाशी राहिल्याने शरीरावर आणि हृदयावर ताण येऊन हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते.
इंटरमिटंट फास्टिंगऐवजी उपवास फायद्याचा
इंटरमिटंट फास्टिंग ही वजन कमी करण्याची चांगली पद्धत नाहीये. कारण उपाशी राहिल्यामुळे तुमची चरबी जळून फॅटलॉस व्हायला मदत होते. मात्र यामुळे जे वजन कमी होते ते क्षणिक किंवा काही काळासाठी ठरू शकतं. कारण तुमचा फॅटलॉस होतोय वेटलॉस नाही. जस तुम्हाला खरच वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला जीवशैली सुधारून पोषक आहारासोबत व्यायामाची सवय लावून घ्यावी लागेल जेणेकरून तुम्हाला आणि तुमच्या शरीराला दीर्घकालीन फायदे होऊ शकतील.
हे सुद्धा वाचा :घरबसल्या वजन कमी करायचं आहे ? ‘या’ पद्धतीने प्या जिरं पाणी आणि फरक पाहा