वजन कमी करण्यामागचं विज्ञान
वजन कमी होणं म्हणजे शरीरातील साठवलेली चरबी ऊर्जा म्हणून वापरली जाणं. जेव्हा शरीराला आवश्यक ऊर्जा अन्नातून मिळत नाही, तेव्हा ते फॅट सेल्स तोडून ऊर्जा निर्माण करतं. या प्रक्रियेला फॅट बर्निंग प्रोसेस म्हणतात. त्यामुळे योग्य आहार आणि नियमित रूटीन हे जिमपेक्षा जास्त प्रभावी ठरू शकतात, असं एक्सपर्ट सांगतात.
advertisement
'वेट लॉसमध्ये 70% भाग आहाराचा असतो' डॉ. गीतिका चोप्रा
होलिस्टिक डायटिशियन आणि न्यूट्रिशनिस्ट गीतिका चोप्रा यांच्या मते, वजन कमी करण्यासाठी जिमला जाणं आवश्यक नाही. त्या म्हणाल्या, “वजन कमी होण्यात 70% भूमिका तुमच्या आहार, रूटीन आणि जीवनशैलीची असते. योग्य वेळी योग्य अन्न घेतलं, तर शरीरातील सूज (inflammation) कमी होते आणि फॅट बर्निंग वेगाने सुरू होते.”
त्या पुढे सांगतात की, अनेकदा हार्मोन्सचा असमतोल जसं की इन्सुलिन, थायरॉइड, लेप्टिन इत्यादी वजन कमी होण्यात अडथळा आणतो. योग्य आहार घेतल्यास हे हार्मोन्स संतुलित राहतात आणि शरीर नैसर्गिकरीत्या स्लिम होऊ लागतं.
दिवसाची सुरुवात अशी करा
सकाळी कोमट पाण्यात लिंबाचा रस घालून पिण्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. डाएटमध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी यासारख्या मोट्या धान्यांचा समावेश करा. सीड्स, नट्स आणि जिरं पाणी यांसारखे एंटी-इंफ्लेमेटरी पदार्थ दररोज घेतल्याने मेटाबॉलिझम वाढतो. पाणी पुरेसं प्या कारण शरीर हायड्रेट नसेल तर पचन बिघडतं आणि वजन वाढू शकतं.
या चुका टाळा
पांढरी साखर आणि मैदा यांचा वापर टाळा हे पदार्थ शरीरात सूज वाढवतात आणि फॅट स्टोरेज वाढवतं. जेवण स्किप करणं टाळा. उपाशी राहणं म्हणजे वजन कमी नाही तर कमजोरी वाढवणं. पाण्याचं सेवन कमी करू नका. उलट पुरेसं पाणी पिणं वजन घटवण्यात मदत करतं.
वजन कमी होणं ही एक स्लो पण सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे. त्यासाठी स्वतःवर दडपण आणू नका. जिममध्ये न जाता सुद्धा योग्य आहार, झोप आणि मनःशांती टिकवली, तर वजन कमी होणं नक्की शक्य आहे.
