युरिक ॲसिडचा त्रास कमी खावीत ही फायदेशीर फळं (Best Food For Uric Acid problem)
केळी (Banana)
आपल्या सगळ्यांना बारा महिने सहज उपलब्ध असणारं फळ म्हणजे केळी. युरिक ॲसिडचा त्रास कमी करण्यात केळी महत्त्वाची भूमिका बजवतात. केळ्यांमध्ये प्युरिन कमी असते, ज्यामुळे युरिक ॲसिड नियंत्रणात राहतं आणि सांधेदुखीचा त्रास कमी होतो.
संत्री (Oranges)
advertisement
हिवाळ्यात उपलब्ध होणारं सगळ्यांच्या आवडीचं आबंटगोड फळ म्हणजे संत्री. संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आढळून येतं. याशिवाय संत्र्यांमध्ये व्हिटॅमिन ई, फोलेट आणि पोटॅशियम असतं. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.याशिवाय शरीरात घातक पदार्थ तयार होण्याचं प्रमाण कमी होतं, ज्यामुळे युरिक ॲसिडचा कमी होऊन सांधेदुखी किंवा संधिवातावर आराम मिळू शकतो.
हे सुद्धा वाचा : ‘या’ चहाने युरिक ॲसिड येईल नियंत्रणात; घरच्या घरी करा 'हा' साधा सोपा उपाय
सफरचंद (Apples)
सफरचंद हे नेहमीच आरोग्यासाठी फायद्याचं आहेत. जेव्हा जेव्हा युरिक ॲसिड वाढून सांधेदुखीचा त्रास होऊ लागतो तेव्हा तेव्हा सफरचंद खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. सफरचंदात फायबर्स भरपूर प्रमाणात असतात जे रक्तातली युरिक ॲसिड वाढलेली पातळी कमी करू शकतात. जेणेकरून युरिक ॲसिड नियंत्रणात येऊन सांधेदुखीचा त्रास कमी होईल.
किवी (Kiwi)
युरिक ॲसिडचा त्रास असलेल्या रूग्णांसाठी किवी अतिशय पौष्टिक फळ मानलं जातं. किवीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि फोलेट असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. यामुळे रक्तातल्या प्लेटलेट्सचं प्रमाण नियंत्रणात राहतं. त्यामुळे रक्तातलं युरिक ॲसिड वाढत नाही.