जेवणानंतर 10 मिनिट एक गोष्ट नियमित केली तर हेल्थ चांगली राहिल. आजारांपासून दूर राहाल. ही महत्त्वाची गोष्ट कोणती आहे? जेवणानंतर 10 मिनिट चालणं ही गरजेची आणि महत्त्वाची गोष्ट आहे. यामुळे अनेक आजारांचा धोका कमी होतो.
पावसामुळे तळवे कुजणार नाहीत, उलट पाय चमकतील! फॉलो करा टिप्स
TOI च्या रिपोर्टनुसार, जेवणानंतर थोड्यावेळ चालणं गरजेचं आहे. चालण्यामुळे पचनक्रिया चांगली होते. यासोबत पोटाचे मसल्य एक्टिव्ह होतात. यामुळे पोटही कमी होतं आणि जेवण पचतंही. हेल्थ एक्सपर्टनुसार, चालल्यामुळे ग्लूकोज लेवल कंट्रोल करण्यात मदत होते. चालण्यामुळे इंसुलिन सेंसिटिव्हिटी सुधारते. कॅलरीज बर्न होतात. मधुमेहाच्या रुग्णांनी तर दररोज 10 मिनिट चालणं गरजेचं आहे.
advertisement
दरम्यान, तुम्हाला ऑलरेडी काही आजार असतील किंवा कशाचा त्रास होत असेल तर डॉक्टरच्या सल्ल्याने तुम्ही व्यायाम किंवा त्यावर उपाय घेऊ शकतात. कारण तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय काही उपाय करणे, गोळ्या खाणे हानिकारक ठरु शकतं.
