TRENDING:

Chutney Recipe : व्वा! पचनाची समस्या दूर करण्याचा सोप्पा मार्ग, फक्त जेवता जेवता खा 'हा' स्वादिष्ट पदार्थ

Last Updated:

Kadamba Chutney recipe : ‘कदंबा चटणी’ ही दक्षिण भारतातील एक पारंपरिक आणि आरोग्यदायी रेसिपी आहे. ही चटणी कोथिंबीर, पुदिना आणि कढीपत्ता यांच्या औषधी गुणधर्मांपासून तयार केली जाते. ‘कदंबा’ या शब्दाचा अर्थ ‘मिश्रण’ असा होतो आणि ही चटणी पचनासाठी रामबाण मानली जाते. इडली, डोसा तसेच भातासोबत ही चटणी खाल्ली जाते. कमी तेलात आणि ताज्या औषधी वनस्पतींच्या वापरामुळे ही चटणी हेल्दी डाएटचा उत्तम भाग ठरते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : दक्षिण भारतीय आहारपद्धती तिच्या साधेपणासाठी आणि आरोग्यदायी गुणांसाठी जगभर प्रसिद्ध आहे. ‘कदंबा चटणी’ याच परंपरेतील एक मौल्यवान घटक आहे. तमिळ भाषेत ‘कदंबा’ या शब्दाचा अर्थ ‘मिश्रण’ असो होतो. कढीपत्ता, कोथिंबीर आणि पुदिना यांसारख्या औषधी गुणधर्मांनी समृद्ध पानांचे हे उत्कृष्ट मिश्रण आहे. ही चटणी केवळ जेवणाची चव वाढवत नाही, तर पचनसंस्थेसाठी नैसर्गिक औषधासारखीही मानली जाते.
पचनासाठी घरगुती उपाय
पचनासाठी घरगुती उपाय
advertisement

कदंबा चटणी तयार करण्यासाठी घरात सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्याचा वापर केला जातो. यामध्ये ताजे कढीपत्ते, कोथिंबीर, पुदिना, उडीद डाळ (2 चमचे), चणा डाळ (1 चमचा), 5-6 सुक्या लाल मिरच्या, आले, लसूण, चिंच, हिंग आणि मीठ लागते. फोडणीसाठी मोहरी, तेल आणि कढीपत्त्याचा वापर केला जातो.

बनवण्याची सोपी पद्धत

सर्वप्रथम एका कढईत तेल गरम करून त्यात उडीद डाळ आणि चणा डाळ सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्या. त्यानंतर सुक्या लाल मिरच्या, आले आणि लसूण घालून सुमारे 1 मिनिट परता. शेवटी हिंग घाला. आता याच कढईत स्वच्छ धुतलेले कढीपत्ते, पुदिना आणि कोथिंबीर घालून थोडे नरम होईपर्यंत परतवा. पानांचा नैसर्गिक हिरवा रंग टिकून राहील याची काळजी घ्या.

advertisement

तयार करण्याची पद्धत

भाजलेले मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतर ते मिक्सरच्या भांड्यात घ्या. त्यात चिंच आणि मीठ घालून थोडे पाणी टाकत आपल्या आवडीनुसार गुळगुळीत किंवा जाडसर वाटून घ्या. शेवटी मोहरी, लाल मिरची आणि कढीपत्त्याची फोडणी देऊन चटणी सर्व्ह करा.

आरोग्यदायी फायदे आणि उपयोग

ही चटणी अँटीऑक्सिडंट्सने भरपूर असल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. यातील आले आणि हिंग पचनक्रिया सुधारतात. कदंबा चटणी प्रामुख्याने इडली आणि डोशासोबत दिली जाते, मात्र अनेक जण ती गरम भातासोबतही आवडीने खातात. प्रत्येक घरात चवीप्रमाणे साहित्यामध्ये थोडाफार बदल करून ही चटणी तयार केली जाते.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
'मुलांना न्याय मिळाला पाहिजे, अन्यथा मी..',जरांगे यांनी MPSC आंदोलनात दिला इशारा
सर्व पहा

Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Chutney Recipe : व्वा! पचनाची समस्या दूर करण्याचा सोप्पा मार्ग, फक्त जेवता जेवता खा 'हा' स्वादिष्ट पदार्थ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल