TRENDING:

Power Nap : दुपारच्या डुलकीबद्दल अपराधी वाटून घेऊ नका, जाणून घ्या छोट्या डुलकीचे मोठे फायदे

Last Updated:

दुपारची एक छोटीशी झोप ही केवळ विश्रांती नाही तर तुमच्या मेंदूसाठी 'रीसेट बटण' आहे असं विज्ञानानंही सिद्ध केलं आहे. छोट्याशा डुलकीचे मोठे फायदे समजून घेऊया.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : दुपारची छोटीशी डुलकी किंवा झोप घेण्यामुळे अपराधी वाटत असेल तर तो विचार मनातून काढून टाका. दुपारी झोपणे हा वेळेचा अपव्यय आहे असं वाटत असेल किंवा कामाच्या मधे झोप घेतल्याबद्दल तुम्हाला अपराधी वाटतंय का? तर तोही विचार मनातून काढा.
News18
News18
advertisement

छोट्याशा डुलकीचे मोठे फायदे समजून घेऊया. दुपारची एक छोटीशी झोप ही केवळ विश्रांती नाही तर तुमच्या मेंदूसाठी 'रीसेट बटण' आहे असं विज्ञानानंही सिद्ध केलं आहे.

जर्मनीतील फ्रीबर्ग विद्यापीठ आणि स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या एका नवीन अभ्यासातले निष्कर्ष पाहूया. रात्रीची चांगली झोप जितकी चांगली असते तितकीच दुपारची डुलकी तुमच्या मेंदूला नवीन आठवणी तयार करण्यासाठी आणि शिकण्यासाठी रीस्टार्ट करते. दुपारची झोप मेंदूला ताजंतवानं करण्यासाठी महत्त्वाची आहे.

advertisement

Antibiotics : अँटीबायोटिक्सचा कोर्स अर्ध्यावर सोडताय? वाचा तब्येतीला होणारे धोके

आपण दिवसभर जागे असतो तेव्हा आपले मेंदू सतत कार्यरत असतात. नवीन माहिती, विचार आणि अनुभव आपल्या मेंदूतील नसांमधील संबंध मजबूत करतात, ज्यांना सायनॅप्स म्हणतात. हे मजबूत संबंध शिकण्यासाठी आवश्यक आहेत, परंतु एका विशिष्ट मर्यादेपलीकडे ते संतृप्त होतात किंवा साचलेपणा येतो. याचा अर्थ असा की मेंदू इतका भारित होतो की तो नवीन माहिती शिकण्याची किंवा लक्षात ठेवण्याची क्षमता गमावतो, अशावेळी झोप येते. ही झोप या अतिरिक्त बाबींवर नियंत्रण ठेवते आणि कोणत्याही महत्त्वाच्या आठवणी न पुसता मेंदूचं संतुलन राखते असं संशोधकांनी स्पष्ट केलंय.

advertisement

अभ्यासाचे प्रमुख, मेडिकल सेंटर-युनिव्हर्सिटी ऑफ फ्रीबर्ग डॉ. क्रिस्टोफ निसेन यांनी दुपारच्या झोपेनं मिळणाऱ्या फ्रेशनेसला "सिनॅप्टिक रीसेट" म्हटलंय. हे 'रीसेट' फक्त दुपारच्या एका झोपेनं देखील होऊ शकते, आमच्या अभ्यासात दिसून आल्याचं डॉ. निसेन यांनी स्पष्ट केलं.

"यामुळे मेंदूमध्ये नवीन आठवणी तयार करण्यासाठी जागा मोकळी होते. कमी कालावधीची झोप देखील मेंदूची नवीन माहिती साठवण्याची क्षमता वाढवते असं या निष्कर्षातून दिसून आलं.

advertisement

या अभ्यासाताठी वीस निरोगी तरुणांचा समावेश होता. संशोधकांनी या तरुणांना दोन गटात विभागलं. पहिल्या गटानं दुपारी सरासरी 45 मिनिटं झोप घेतली. दुसरा गट दुपारी पूर्णपणे जागे राहिला.

मेंदूचे कनेक्शन किती मजबूत किंवा लवचिक आहेत हे तपासण्यासाठी शास्त्रज्ञांनी ट्रान्सक्रॅनियल मॅग्नेटिक स्टिम्युलेशन आणि ईईजी सारख्या आधुनिक आणि सुरक्षित तंत्रांचा वापर केला.

Korean Skin Care : कोरियन मुलींच्या सौंदर्याचं रहस्य, कोरियन स्किन केअर रुटिन

advertisement

न्यूरोइमेज जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासाचे निष्कर्ष पाहूयात.

मेंदू उपचार - मेंदूतील सिनॅप्टिक कनेक्शनसाठी दुपारची झोप फायदेशीर असल्याचं संशोधकांनी म्हटलंय. संशोधकांनी याला झोपेचा रेस्टोरेटिव इफेक्ट असं म्हटलंय.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सात वाजताच होतात मोबाईल आणि टीव्ही बंद,या गावाचा कौतुकास्पद निर्णय
सर्व पहा

सुधारित शिकण्याची क्षमता - ज्यांनी डुलकी घेतली त्या झोपलेल्या सहभागींचे मेंदू जागे राहणाऱ्यांपेक्षा नवीन संबंध निर्माण करण्यात तुलनेनं चांगले होते. याचा अर्थ त्यांचा मेंदू नवीन गोष्टी शिकण्यासाठी अधिक तयार होता. झोप कितीही कमी असली तरी, आपल्या मेंदूची लवचिकता राखण्यासाठी ती अत्यंत महत्त्वाची असते असं या अभ्यासातून स्पष्टपणे दिसून येतं.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Power Nap : दुपारच्या डुलकीबद्दल अपराधी वाटून घेऊ नका, जाणून घ्या छोट्या डुलकीचे मोठे फायदे
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल