TRENDING:

Lemon Grass : बहुगुणी गवती चहाचे उपयोग, पचनशक्ती सुधारण्यापासून तणाव दूर करण्यासाठीही उपयुक्त

Last Updated:

लेमनग्रास म्हणजेच गवती चहामधे भरपूर औषधी गुणधर्म असतात. विविध आजारांवर उपचार करण्यासाठी गवती चहाचा वापर होते. आयुर्वेदात, लेमनग्रासला 'भूस्त्रीण' म्हणून ओळखलं जातं. वात, पित्त आणि कफ दोष संतुलित करण्यासाठी याची मदत होते आणि सांधे आणि स्नायूंच्या वेदनांपासून देखील यामुळे आराम मिळतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : गवती चहानं आपल्या रोजच्या चहाची चव तर वाढतेच पण याचे आणखीही अनेक फायदे आहेत.  आयुर्वेदात शतकानुशतकं औषधी वनस्पतींचा वापर उपचारांसाठी केला जातो आहे, पण आजच्या काळात जुन्या औषधी वनस्पतींची नावं वेगळी वाटतात. कारण जुन्या वनस्पतींची वैज्ञानिक नावं देऊन त्याचं मार्केटिंग केलं जातंय.
News18
News18
advertisement

तर ही गोष्ट आहे गवती चहाची. सेलिब्रिटींपासून ते फिटनेस प्रेमींपपर्यंत सर्वजण याचा वापर करत आहेत. अलिकडच्या काळात लेमनग्रास ही एक क्रेझ बनली आहे, पण आयुर्वेदात शतकानुशतकं याचा वापर केला जात आहे.

लेमनग्रासचे फायदे - लेमनग्रास म्हणजेच गवती चहामधे भरपूर औषधी गुणधर्म असतात. विविध आजारांवर उपचार करण्यासाठी गवती चहाचा वापर होते. आयुर्वेदात, लेमनग्रासला 'भूस्त्रीण' म्हणून ओळखलं जातं. वात, पित्त आणि कफ दोष संतुलित करण्यासाठी याची मदत होते आणि सांधे आणि स्नायूंच्या वेदनांपासून देखील यामुळे आराम मिळतो.

advertisement

Giloy : प्लेटलेट्स वाढवण्यासाठी उपयुक्त गुळवेल, जाणून घ्या अमृतवेलाचे आणखी फायदे

गवती चहाची चव थोडी कडू आणि तिखट असते, पण याचा परिणाम थंडावा देणारा असतो. गवती चहामुळे, नसा शांत होतात आणि मज्जासंस्था मजबूत होते, ज्यामुळे मेंदू आणि शरीराचे सिग्नल वाढतात. याशिवाय, खोकला, ताप, क्षयरोग, कुष्ठरोग, फाइलेरियासिस, मलेरिया, डोळ्यांची सूज, हिरड्यांची सूज, न्यूमोनिया आणि रक्तातील अशुद्धतेशी संबंधित विकारांच्या निराकरणातही गवती चहा उपयुक्त आहे.

advertisement

लेमनग्रास ऑईल म्हणजेच तेलामुळे पचन सुधारतं. मळमळ, मासिक पाळीच्या समस्या आणि डोकेदुखी यामुळे दूर होते. शिवाय, लेमनग्रास पेस्ट त्वचेच्या समस्यांवर लावता येते आणि औषध म्हणून वापरली जाऊ शकते.

काम करताना कॅफिन वाढवण्याची गरज असेल तर लेमनग्रास चहा वापरून पहा. हा चहा स्वादिष्ट आणि आरोग्यदायी दोन्ही आहे. झोपेच्या समस्या आणि ताणतणावावर उपचार करण्यासाठी लेमनग्रास तेल देखील एक उत्तम पर्याय आहे. ते चेहऱ्यावर किंवा कपाळावर हलक्या हातानं मसाज करून लावता येतं.

advertisement

Raisins : शरीराच्या अंतर्बाह्य मजबुतीसाठी उत्तम, भिजवलेल्या मनुका खाण्याचे फायदे

लेमनग्रास वापरण्याच्या विविध पद्धतींबद्दल जाणून घेऊया. दररोज ताजा लेमनग्रास रस पिण्यानं शरीर विषमुक्त करण्यास मदत होते.

लेमनग्रास चहा कसा बनवायचा - लेमनग्रास चहा बनवण्यासाठी, ताज्या किंवा वाळलेल्या गवती चहाची देठं चिरून घ्या आणि पाण्यात उकळा. ते पाच ते दहा मिनिटं तसंच भिजू द्या आणि नंतर गाळा. चवीसाठी यात मध किंवा लिंबू घालू शकता. लेमनग्रास चहा आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
150 रुपयांना खरेदी करा अन् 300 ला विका, पिंपरीत ट्रेंडी कुर्तींचं होलसेल मार्केट
सर्व पहा

दररोज एक किंवा दोन कप इतकंच प्रमाण मर्यादित ठेवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. गर्भवती महिला किंवा इतर औषधं घेणाऱ्या महिलांनी घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Lemon Grass : बहुगुणी गवती चहाचे उपयोग, पचनशक्ती सुधारण्यापासून तणाव दूर करण्यासाठीही उपयुक्त
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल