TRENDING:

Kidney Damage : किडनी खराब होऊ लागल्यावर त्वचेवर दिसतात 5 लक्षण, दुर्लक्ष करू नका

Last Updated:

किडनी खराब होत असताना तुमच्या त्वचेवर त्याची काही लक्षण जाणवू लागतात. या लक्षणांना वेळीच ओळखलं आणि त्यावर उपचार घेतले तर आरोग्याच्या समस्या दूर होऊ शकतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
किडनी हा मानवी शरीरातील एक महत्वाचा अवयव आहे. किडनी शरीरातील विषारी पदार्थ फिल्टर करून लघवीद्वारे बाहेर टाकण्याचे कार्य करते. जर किडनी खराब झाली तर ती शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढण्याचे कार्य योग्य प्रकारे करू शकत नाही आणि त्यामुळे शरीरात हे विषारी पदार्थ साठू लागतात. ज्यामुळे शरीराच्या अनेक गंभीर समस्या देखील जाणवू लागतात. अनहेल्दी खाण, चुकीची जीवनशैली इत्यादी किडनी खराब होण्याची प्रमुख कारण आहेत. परंतु किडनी खराब होत असताना तुमच्या त्वचेवर त्याची काही लक्षण जाणवू लागतात. या लक्षणांना वेळीच ओळखलं आणि त्यावर उपचार घेतले तर आरोग्याच्या समस्या दूर होऊ शकतात.
किडनी खराब होऊ लागल्यावर त्वचेवर दिसतात 5 लक्षण
किडनी खराब होऊ लागल्यावर त्वचेवर दिसतात 5 लक्षण
advertisement

त्वचेवर दिसणारी लक्षण :

त्वचा कोरडी होणे : जर तुमची त्वचा खूप जास्त कोरडी होत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नये. अचानकपणे त्वचा जास्त कोरडी होऊ लागणे हे किडनी खराब होत असल्याचे लक्षण आहे. जेव्हा किडनी नीट काम करत नाही तेव्हा शरीरात फॉस्फोरस आणि मिनरल्सची मात्रा वाढू लागते. ज्यामुळे त्वचा जास्त कोरडी होऊ लागते.

advertisement

त्वचेवर लाल रंगाचे चट्टे उठणे : जेव्हा किडनी व्यवस्थित काम करत नाही तेव्हा त्वचेवर काहीवेळा लाल रंगाचे चट्टे दिसू लागतात. जर तुम्हाला अशी समस्या जाणवत असेल तर डॉक्टरांकडे जाऊन योग्य उपचार घ्या.

त्वचेला खाज येणे : ऍलर्जी किंवा इंफेक्शन इत्यादींमुळे देखील त्वचेला खाज येऊ शकते. परंतु जर उपाय करूनही त्वचेला खाज येण्याची समस्या दूर होत नसेल तर हे किडनी खराब झाल्याचे लक्षण असू शकते. तेव्हा जर खूप कालावधीपासून तुमच्या त्वचेला खाज येत असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधावा.

advertisement

Health Tips : जेवल्यानंतर छातीत जळजळतं? मग जेवणात मिसळा 'हा' एक पदार्थ, समस्या होईल दूर

त्वचेला सूज येणे : त्वचेला सूज येणे हे देखील किडनी खराब झाल्याचे लक्षण आहे. जेव्हा किडनी व्यवस्थित काम करत नसेल अशावेळी शरीरात टॉक्सिंस आणि सोडियम जमा होऊ लागते त्यामुळे शरीराला सूज येऊ लागते. अशावेळी जर तुमच्या पायांना, हातांना, डोळ्यांच्या आजूबाजूला सूज येत असेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: कृषी मार्केटनं वाढवलं टेन्शन; द्राक्षे, केळीची आवक घटली, कांदा अन् लिंबूला किती मिळाला भाव?
सर्व पहा

त्वचेचा रंग बदलणे : त्वचेचा रंग अचानकपणे बदलणे हे देखील किडनी खराब होण्याचे लक्षण आहे. किडनी जेव्हा खराब होते तेव्हा त्वचेचा रंग हा पिवळा किंवा गडद होऊ लागतो. यामुळे नखांचा रंग देखील बदलतो.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Kidney Damage : किडनी खराब होऊ लागल्यावर त्वचेवर दिसतात 5 लक्षण, दुर्लक्ष करू नका
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल