Health Tips : जेवल्यानंतर छातीत जळजळतं? मग जेवणात मिसळा 'हा' एक पदार्थ, समस्या होईल दूर
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
काहीजणांना जेवल्यानंतर छातीत जळजळ होऊ लागते, त्यामुळे अस्वस्थ व्हायला होत. अशावेळी या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी काहीजण औषधांचा सहारा घेतात, परंतु यामुळे शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतात.
सध्या धकाधकीचं जीवन, अनहेल्दी लाईफस्टाईल इत्यादींमुळे अनेकांना आरोग्याशी संबंधित बऱ्याच समस्या जाणवू लागल्या आहेत. काहीजणांना जेवल्यानंतर छातीत जळजळ होऊ लागते, त्यामुळे अस्वस्थ व्हायला होत. अशावेळी या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी काहीजण औषधांचा सहारा घेतात, परंतु यामुळे शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतात. तेव्हा तुम्हाला असा एक पदार्थ सांगणार आहोत ज्याचे सेवन केल्याने छातीत जळजळ होण्याची समस्या दूर होऊ शकते.
जेवल्यानंतर जर तुम्हाला छातीत जळजळ होत असेल तर तुम्ही जेवणात साबूत अनाज म्हणजेच धान्याचा आहारात जास्त समावेश करावा. धान्यांमध्ये फायबरचा चांगला स्रोत असतो तसेच यामुळे शरीराला इतर पोषकतत्व देखील मिळतात. उदाहरण पाहायचे झाले तर तुम्ही सकाळी नाश्त्याला किंवा जेवणात मूगडाळीची खिचडी, रात्रीच्या जेवणात दलिया इत्यादीचे सेवन करू शकता. या आहारामुळे जेवल्यानंतर छातीत जळजळ होण्याची समस्या दूर होते.
advertisement

छातीत जळजळ होऊ नये यासाठी तुम्ही आहारात धान्यांचा समावेश करण्यासोबतच काही पदार्थ खाण देखील टाळायला हवं, ज्यामुळे एसिड रिफ्लक्सची समस्या उद्भवते. जसे की तिखट मसालेदार पदार्थ, शीळ अन्न इत्यादी. जर तुम्हाला घरगुती उपाय आणि आहारात बदल करूनही छातीत जळजळ होण्याच्या समस्येपासून आराम मिळत नसेल तर अशा व्यक्तींनी त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधायला हवा.
advertisement
(सदर माहिती ही इंटरनेटवरून मिळालेल्या मजकुरावर आधारित आहे. त्यामुळे आहारात कोणताही बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 01, 2024 3:13 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Health Tips : जेवल्यानंतर छातीत जळजळतं? मग जेवणात मिसळा 'हा' एक पदार्थ, समस्या होईल दूर








