TRENDING:

Kitchen Jugaad Video : बटाट्याला छेद करून त्यात एक गोष्ट टाका, 5 वर्षे उंदीर घरात दिसणार नाही

Last Updated:

Kitchen Tips Marathi : बटाटा तुम्हाला उंदरांपासून सुटका मिळवून देईल असं सांगितलं तर... साहजिकच आश्चर्य वाटलं असेल पण या किचन जुगाडचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली :  उंदीर म्हटलं की घरातील सामानांचं नासधूस करतात. किचनमधील पदार्थ खातात. त्यापैकीच एक म्हणजे बटाटा. पण हाच बटाटा तुम्हाला उंदरांपासून सुटका मिळवून देईल असं सांगितलं तर... साहजिकच आश्चर्य वाटलं असेल पण या किचन जुगाडचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
News18
News18
advertisement

बटाट्याने उंदरांना कसं पळवायचं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. यासाठी तुम्हाला बटाट्यासोबत माचिस आणि तुरटीही लागणार आहे. सगळ्यात आधी 10 ते 15 माचिसच्या काड्या घ्या. माचिसच्या का़डीवर जो काळा भाग असतो तो एका वाटीत काढून घ्या. तुरटीची पूड करून यात टाका. आता यात बेकिंग सोडा, लाल मसाला आणि एक चमचा पाणी टाकून मिक्स करून घ्या. चमच्याने पडेल इतकं पातळ मिश्रण करा, जसं व्हिडीओत दाखवलं आहे, तितकं हे पातळ मिश्रण असावं.

advertisement

Kitchen Jugaad Video : 5 वर्षे एकही उंदीर घरात दिसणार नाही, उंदरांपासून सुटकेसाठी घरगुती उपाय

आता बटाटा घ्या, त्याच्या गोल पण जाड अशा चकत्या करा. प्रत्येक बटाट्याच्या चकतीचा मधील भाग कापून वाटीसारखा करा. तयार केलेलं मिश्रण या बटाट्याच्या वाटीत भरा. आता बटाट्याचा जो भाग आपण आधी कापला होता तो बटाट्यात मिश्रण भरल्यानंतर त्यावर पुन्हा लावून मिश्रणाचा भाग झाकून घ्या.

advertisement

जिथं उंदीर येतात किंवा जिथून उंदीर येतात, जिथं जिथं उंदीर दिसतात त्या ठिकाणी हे बटाटे ठेवून द्या. उंदीर घरात आले तरी लगेच पळून जातील. किंबहुना पुढील 5 वर्षे उंदीर घरात दिसणार नाहीत, असा दावा या व्हिडीओत महिलेने केला आहे. तसंच तिने तुमच्या घरात लहान मुलं असतील तर काळजी घ्या. हा बटाटा त्यांच्यापासून दूर ठेवा असा सल्ला तिने दिला आहे.

advertisement

Kitchen Jugaad Video : उंदीर घरात येणं दूर, घराचा रस्ताच विसरतील, 100 टक्के परिणामकारक उपाय

उंदीर पळवण्यासाठी तसे बरेच उपाय आहेत. कुणी पिंजरा लावतं, तर कुणी बाजारात मिळणारं केमिकलयुक्त औषधं आणतं. पण काही वेळा उंदीर घरातच मरतात. त्यामुळे घरात वास येतो. त्यांना बाहेर फेकण्याचा प्रश्न येतोच. पण या उपायाने उंदीर खाऊन घरात मरणार नाहीत लगेच बाहेर पळून जातील, असं या व्हिडीओत सांगण्यात आलं आहे.

advertisement

(सूचना : हा लेख सोशल मीडियामधील व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. व्हिडीओत करण्यात आलेल्या दाव्याची हमी न्यूज18मराठी देत नाही.)

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Kitchen Jugaad Video : बटाट्याला छेद करून त्यात एक गोष्ट टाका, 5 वर्षे उंदीर घरात दिसणार नाही
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल