Kitchen Jugaad Video : उंदीर घरात येणं दूर, घराचा रस्ताच विसरतील, 100 टक्के परिणामकारक उपाय

Last Updated:

Kitchen Tips In Marathi : कित्येकांना उंदरांना मारायचं नसतं पण त्यांना घरातून बाहेर काढायचं असतं. उंदरांना पळवण्याच्या जबरदस्त अशा या किचन जुगाडचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

News18
News18
नवी दिल्ली : कितीही स्वच्छता ठेवा, काहीही करा. पण घरात उंदीर होतातच. एकदा का घरात उंदीर घुसले की घरातून बाहेर निघता निघत नाहीत. उंदरांना घरातून पळवण्यासाठी तसे बरेच उपाय आहेत. पण सध्या सोशल मीडियावर असा उपाय व्हायरल होतो आहे. ज्यामुळे एकदा हा उंदीर तुमच्या घरातून बाहेर पडलात तर ते घरात येणं सोडाल. घराचा रस्त्याच विसरतील.
उंदरांना पळण्याच्या जबरदस्त अशा या किचन जुगाडचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. कित्येकांना उंदरांना मारायचं नसतं पण त्यांना घरातून बाहेर काढायचं असतं किंवा उंदीर घरात मेला तर त्याची खूप दुर्गंधी येते. त्यामुळे उंदरांना न मारता त्यांच्यापासून मुक्ती मिळण्याचा हा उपाय आहे.
advertisement
उंदरांना न मारता घरातून बाहेर पळवण्यासाठी उंदरांना सगळ्यात आधी आकर्षित करायचं आहे. यासाठी गव्हाचं पीठ घ्या, साखर आणि तूप घ्या. पाणी घालून सैलसर पीठ मळून घ्या. याचे छोटे छोटे गोळे करायचे आहेत. आता तुम्ही म्हणाल उंदरांना तर असे खाद्यपदार्थांचे वास आवडतात मग ते पळण्याऐवजी उलट अधिकच घरात येतील. तर तसं नाही. याचं कारण म्हणजे त्या पीठातील मिश्रण.
advertisement
एका वाटीत डिटर्जंट पावडर आणि फिनाईलच्या गोळीची पूड करून घ्यायची आहे. एकत्र करून, ही पावडर गोळ्यांच्या वाट्या करून त्यात थोडी थोडी भरून पुन्हा गोळे करून घ्यायची आहे.
advertisement
आता हे गोळे घरात वेगवेगळ्या ठिकाणी ठेवा. जिथं उंदीर असण्याची शक्यता आहे. याच्या वासामुळे न मारता उंदीर घरातून पळतील. ते पुन्हा तुमच्या घरातच येणार नाहीच. उलट घराचा रस्ता विसरतील असा दावा या महिलेने केला आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad Video : उंदीर घरात येणं दूर, घराचा रस्ताच विसरतील, 100 टक्के परिणामकारक उपाय
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement