TRENDING:

Kitchen Tips : स्वयंपाक करताना घामाने हाल होतात? 'या' टिप्स वापरा, उन्हाळ्यातही किचन राहील थंड

Last Updated:

कडक उन्हामुळे घरांमध्ये प्रचंड उकाडा जाणवत आहे. अशा स्थितीत स्वयंपाकघरामध्ये जेवण बनवताना महिलांना त्रास होत आहे. गॅस स्टोव्हच्या वापरामुळे, घरातल्या इतर खोल्यांच्या तुलनेत स्वयंपाकघरात जास्त गरम होतं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : भारतामध्ये सध्या कडाक्याचा उन्हाळा सुरू आहे. तज्ज्ञांच्या मते, या वर्षीच्या उन्हाळ्याने उष्णतेचे मागचे अनेक विक्रम मोडून काढले आहेत. कडक उन्हामुळे घरांमध्ये प्रचंड उकाडा जाणवत आहे. अशा स्थितीत स्वयंपाकघरामध्ये जेवण बनवताना महिलांना त्रास होत आहे. गॅस स्टोव्हच्या वापरामुळे, घरातल्या इतर खोल्यांच्या तुलनेत स्वयंपाकघरात जास्त गरम होतं. स्वयंपाकघरातली उष्णता कमी केल्यास घरातील महिला आरामदायी वातावरणात स्वयंपाक करू शकतात आणि ऊर्जा खर्च कमी करण्यातही मदत होऊ शकते. त्यासाठी काही टिप्स जाणून घेऊ या आहेत.
News18
News18
advertisement

एक्झॉस्ट फॅनचा वापर : उष्णता, वाफ आणि स्वयंपाकाचा तिखट-तेलकट वास दूर करण्यासाठी स्वयंपाकघरातला एक्झॉस्ट फॅन सुरू केला पाहिजे. व्हेंटिलेशनमुळे हवेच्या वितरणात लक्षणीयरीत्या सुधारणा होऊ शकते आणि स्वयंपाकघरातलं तापमान कमी होऊ शकतं.

उष्णता कमी करणाऱ्या उपकरणांचा वापर : उष्णता कमी करण्यासाठी डिझाइन केलेल्या उपकरणांचा वापर केला पाहिजे. उदाहरणार्थ, इंडक्शन कुकटॉप पारंपरिक स्टोव्हटॉपपेक्षा कमी उष्णता निर्माण करतात. मायक्रोवेव्ह, टोस्टर ओव्हन किंवा एअर फ्रायरसारखी छोटी उपकरणंसुद्धा कमी उष्णता निर्माण करतात. त्यामुळे स्वयंपाकघर थंड ठेवण्यास मदत होऊ शकते.

advertisement

शिटीऐवजी कुकरच्या झाकणातून वाफ बाहेर येतेय? 'या' 6 टिप्स वापरा, झटपट होईल स्वयंपाक

स्वयंपाकासाठी कमी उष्णता निर्माण करणारी पद्धत वापरणं : कमी उष्णता निर्माण करणाऱ्या स्वयंपाक पद्धतींचा वापर केला पाहिजे. तळणं किंवा भाजणं यासारख्या पद्धतींपेक्षा वाफवणं, उकळणं किंवा परतणं यांचा वापर केल्यास कमी उष्णता निर्माण होऊ शकते.

advertisement

उष्णता-प्रतिरोधक विंडो कव्हरिंग्ज वापरणं : घरात येणारा थेट सूर्यप्रकाश रोखण्यासाठी आणि स्वयंपाकघर खूप लवकर गरम होण्यापासून रोखण्यासाठी उष्णता-प्रतिरोधक विंडो कव्हरिंग्ज वापरली पाहिजेत.

जेवण बनवताना योग्य वेळ पाळणं : जास्त उष्णता टाळण्यासाठी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा स्वयंपाक केला पाहिजे. दुपारच्या वेळी स्वयंपाक केल्यास जास्त गरम होऊ शकतं.

रेफ्रिजरेशन ऑप्टिमाइझ करणं : आपला रेफ्रिजरेटर आणि फ्रीझर कॉइल स्वच्छ ठेवली पाहिजे. त्यात प्रमाणापेक्षा जास्त सामान न ठेवता तो कार्यक्षमतेने काम करत असल्याची खात्री केली पाहिजे. यामुळे फ्रीज अधिक कार्यक्षमतेने काम करील आणि अतिरिक्त उष्णता निर्माण करणार नाही.

advertisement

फ्रिज नसल्याने टोमॅटो लवकर खराब होतात? पाहा फ्रिजशिवाय टोमॅटो कसे साठवावे..

फॅन आणि एसी वापरणं : 'ऑन मनोरमा'मध्ये सांगितल्याप्रमाणे सीलिंग फॅन किंवा पोर्टेबल फॅन असल्यास स्वयंपाकघरात हवा खेळती राहण्यासाठी त्यांचा वापर करा. याशिवाय, घरातलं तापमान कमी ठेवण्यासाठी एसीचाही वापर करता येईल.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Kitchen Tips : स्वयंपाक करताना घामाने हाल होतात? 'या' टिप्स वापरा, उन्हाळ्यातही किचन राहील थंड
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल