लाल मसाला टॉयलेटमध्ये टाकणं, हे तुम्हाला विचित्र वाटत असेल. लाल मसाल्याचा अनोखा असा वापर पाहून तुम्ही थक्क व्हाल. पण एकदा का याचा परिणाम पाहाल तर तुम्हीसुद्धा हा उपाय कराल. लाल मसाला टॉयलेटमध्ये टाकल्यानं काय होतं? त्याचा असा काय परिणाम आहे. हे पाहण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल.
नेमकं करायचं काय?
तुम्हाला शॅम्पू, बेकिंग सोडा, लाल मसाला आणि साबण घ्यायचा आहे. एका ताटात हे सर्व मिक्स करायचं आहे. आता साबण घ्या. अंघोळीचा, कपड्याचा, भांड्याचा कोणताही साबण तुम्ही घेऊ शकता. साबणाचे तुकडे उरतात त्याचाही तुम्ही वापर करू शकतात. साबण किसून टाका. सर्व मिश्रण एकत्र करून घ्या.
advertisement
Kitchen Jugaad Video : पिठाचे गोळे प्लॅस्टिक पिशवीवर ठेवताच कमाल; काही सेकंदात चपात्या तयार
आता बाटलीचं एक झाकण घ्या. त्यात तुम्ही तयार केलेलं मिश्रण भरा. आता हे झाकण एका प्लॅस्टिक पिशवीत गुंडाळा, मागून रबर लावा. अतिरिक्त प्लॅस्टिक पिशवी कापून टाका.
याचा टॉयलेटमध्ये फायदा काय?
हे मिश्रण भरलेलं झाकण टॉयलेटच्या फ्लॅश टँकमध्ये टाका. यातील मिश्रण पाण्यात मिक्स होईल. जेव्हा जेव्हा तुम्ही फ्लश कराल तेव्हा हे मिश्रण मिसळलेलं पाणी टॉयलेटमध्ये येईल आणि टॉयलेट आपोआप स्वच्छ होईल. या मिश्रणात शॅम्पू असल्याने त्याचा सुगंध येतो. शॅम्पू आणि बेकिंग सोडा क्लिनिंगचं काम करतो, दुर्गंधीही दूर करतो. टॉयलेटमधून छोटे छोटे कीे येतात, ती समस्या लाल मसाल्याने दूर होईल, असा दावा महिलेनं व्हिडीओत केला आहे.
इथं पाहा व्हिडीओ
Vardan Pakwan युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा.
Kitchen Jugaad Video : पावसात कांदा वापरण्याआधी त्यात पेपरचे तुकडे टाका; काय कमाल होते पाहा
(सूचना : हा लेख सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी काहीही संबंध नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.)