रांची : अनेक लोकांना बसता बसता पाय हलवण्याची सवय असते. या सवयीमुळे घरातील वरिष्ठ अनेकांना टोकतात. पाय हलवणे हे अशुभ आहे, असे वरिष्ठांना वाटते. मात्र, यामाघे एक मोठे आणि महत्त्वाचे कारण आहे. नेमकं काय कारण आहे, हे आपण जाणून घेऊयात.
झारखंडची राजधानी रांची येथील ज्योतिष आचार्य संतोष कुमार चौबे यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी रांची विद्यापीठातून ज्योतिष शास्त्रात सुवर्णपदक जिंकलं आहे. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, काही लोकं विनाकारण पाय हलवतात, हे तुम्ही अनेकदा पाहिले असेल. मात्र, पाय हलवणे हे तुमच्या व्यक्तीमत्त्वाचं गुपित खोलतात. तुमचं व्यक्तिमत्त्व कसं आहे, हे दर्शवते.
advertisement
पाय हलवण्याचा अर्थ काय -
संतोष यांनी सांगितले की, जे लोकं पाय हलवतात याचे कनेक्शन तुमच्या मेंदूशी आणि मनाशी आहे. तुमचे मन स्थिर नाही. तुमच्या आता स्थिरता आणि ठामपणा नाही. ते एखाद्या गोष्टीबाबत संभ्रमावस्थेत आहेत किंवा मग त्यांच्या मनात अनेक विचार आणि तणावासारखी स्थिती आहे, त्यामुळे ते लोक स्थिर बसत नाहीत, असा याचा अर्थ होतो. त्यांच्या आत असलेली अस्वस्थता हे दर्शवते. ते कोणतेही मोठे काम करू शकत नाही आणि लहान लहान संकटं त्यांच्या आयुष्यात येत असतात, असे ते म्हणाले.
पुढे त्यांनी सांगितले की, तुमच्या राशीतील राहू ग्रह खराब आहे, पाय हलवण्याचा अर्थ असा असाही आहे. राहू खराब असल्यावर संभ्रमावस्था तयार होते. यामुळे तुम्ही खूप जास्त महत्त्वाकांक्षी होतात. तुम्हाला तो मोठमोठी स्वप्ने दाखवेल. मात्र, मेहनत करताना तुम्हाला तो आळशी बनवेल.
ही सवय कशी सुधारावी -
ज्योतिष आचार्य संतोष कुमार चौबे यांनी ही सवय कशी सुधारावी याबाबतही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, या सवयीला जर सुधारायचे असेल तर तुम्हाला सर्वात आधी योग, प्राणायाम करावा लागेल. यामुळे तुमचा श्वास यामुळे स्थिर होईल आणि हळूहळू तुमच्या शरीरातील इतर अवयवही स्थिर होतील. ध्यानधारणा एक चांगला पर्याय आहे. यामुळे मन आणि मेंदूत स्पष्टता येईल आणि संभ्रम दूर होईल. तसेच चीडचीड, राग किंवा अस्वस्थता दूर होईल.
सूचना : या बातमीत दिलेली माहिती ही ज्योतिषाचार्यांशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. याबाबत लोकल18 कोणताही दावा करत नाही.