टोमॅटो सॉस आणि केचप हे दोन्ही टोमॅटो पासूनच बनवले जाते परंतु दोघांमध्ये बराच फरक आहे. केचप बनवण्यासाठी फक्त टोमॅटोचा वापर केला जातो, तसेच त्यात साखर आणि काही गोड आणि आंबट मसाले घालून घट्ट बनवले जाते. त्याचवेळी, टोमॅटोशिवाय इतर गोष्टींचा देखील सॉस बनवता येतो आणि त्यासाठी तेलाचाही वापर केला जातो. टोमॅटो केचपमध्ये 25 टक्के साखर असू शकते, तर सॉसमध्ये साखर नाही तर मसाले टाकले जातात.
advertisement
तुम्हीही उकडलेले बटाटेही फ्रीजमध्ये ठेवता? तर ही महत्वाची गोष्ट घ्या जाणून
केचप हा एक टेबल सॉस आहे जो टोमॅटोपासून बनवल्या जाणाऱ्या सॉसची एक आधुनिक आवृत्ती आहे. केचप हा टोमॅटो सॉस पेक्षा पातळ असतो आणो तो तुम्ही कोणत्याही पदार्थासोबत तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता. तर टोमॅटो सॉसला तुम्ही टोमॅटोची चटणी देखील म्हणू शकता. टोमॅटो सॉस आणि केचपमध्ये मोठा फरक असा की केचपमध्ये साखर असते आणि सॉसमध्ये साखर नसते.