तज्ज्ञांच्या मते, जे लोक धूम्रपान, दारू किंवा कोणत्याही नशेच्या पदार्थांचे सेवन करतात अशा लोकांना कॅन्सर होण्याचा धोका जास्त असतो. धूम्रपान आणि दारू प्यायल्याने लिव्हर आणि ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढू शकतो. तेव्हा कॅन्सर कोण कोणत्या कारणामुळे होऊ शकतो आणि त्यापासून वाचण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करायला हवे याविषयी माहिती करून घ्या.
advertisement
झोपेची कमतरता : तज्ञ सांगतात की, अनेकजण विविध कारणांमुळे झोप कमी घेतात, त्यामुळे कॅन्सरचा धोका वाढू शकतो. अशावेळी तुम्ही कितीही बिझी असाल तरी कमीतकमी 7 ते 8 तासांची झोप घेणे आवश्यक आहे. तसेच जे लोक शारीरिक दृष्ट्या ऍक्टिव्ह नाहीत अशांना कॅन्सर होण्याचा धोका अधिक वाढतो. तेव्हा वेळातवेळ काढून तुम्ही दररोज योगा, एक्सरसाईज करायला हवी.
Cervical Cancer : महिलांनी सर्वायकल कॅन्सरपासून कसं वाचायचं? 98 टक्के प्रभावी ठरतो हा उपाय
प्लास्टिक : तज्ज्ञ सांगतात की, कॅन्सर होण्याची अनेक कारण आहेत आणि त्यापैकीच एक म्हणजे प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिणे. प्लास्टिक बॉटलमध्ये ठेवलेल्या पाण्यामध्ये माइक्रो प्लास्टिक आढळतात. अनेकजण गरम चहा पिण्यासाठी प्लास्टिक किंवा कागदाच्या कपांचा वापर करतात. परंतु प्लास्टिकच्या वस्तूमधून पाणी किंवा कोणत्याही द्रव पदार्थाचे सेवन केल्याने शरीरात माइक्रो प्लास्टिक जातात आणि त्यामुळे कॅन्सरचा धोका उद्भवू शकतो. टी बॅगच्या वापरामुळे देखील कॅन्सरचा धोका वाढू शकतो. कारण यामध्ये एपिक्लोरो हाइड्रिन नावाचे रसायन असते जे गरम पाण्यात मिक्स होते आणि शरीरात पोहोचते. हे रसायन आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
कोण कोणत्या पदार्थांचे सेवन करावे :
तज्ज्ञ सांगतात की, कॅन्सर पासून वाचायचं असेल तर आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करण्यासोबतच खाण्यापिण्याकडे देखील विशेष लक्ष द्यायला हवे. काही असे अन्न पदार्थ आहेत हे तुम्हाला कॅन्सरपासून वाचवण्यास मदत करू शकतात. आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करायला हवा यामुळे शरीराला असे रसायन मिळतात जे कॅन्सरशी लढण्यासाठी फायदेशीर ठरतात. याशिवाय सफरचंद, जांभूळ, लसूण, कांदा, मसाले, व्हिटॅमिन ए, ई आणि सी असलेलं पदार्थ कॅन्सरचा धोका कमी करण्यास मदत करू शकतात. तसेच संपूर्ण धान्य जसे मका, डाळी, ओट्स, राई, शेंगा, बिया इत्यादींचा देखील आहारत समावेश करू शकता.
