advertisement

Cervical Cancer : महिलांनी सर्वायकल कॅन्सरपासून कसं वाचायचं? 98 टक्के प्रभावी ठरतो हा उपाय

Last Updated:

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार सर्वायकल कॅन्सर हा देशातील महिलांमध्ये होणारा दुसरा सर्वात कॉमन कॅन्सर आहे. यामुळे हजारो महिला दरवर्षी त्यांचे प्राण गमावतात.

सर्वायकल कॅन्सर
सर्वायकल कॅन्सर
नवी दिल्ली : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी आर्थिक वर्ष 2024-25 साठी शेवटचे बजेट सादर केले. यात सीतारामन यांनी सर्वायकल कॅन्सरवरील लसीबाबत मोठी घोषणा केली. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, सरकार सर्वायकल कॅन्सरला रोखण्यासाठी लसीकरण मोहीम सुरु करेल ज्यामध्ये 9 ते 14 वर्षांपर्यंतच्या मुलींना एचपीवी लस देण्यात येईल, ज्यामुळे सर्वायकल कॅन्सरचा प्रसार रोखता येईल. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार सर्वायकल कॅन्सर हा देशातील महिलांमध्ये होणारा दुसरा सर्वात कॉमन कॅन्सर आहे. यामुळे हजारो महिला दरवर्षी त्यांचे प्राण गमावतात. सर्वायकल कॅन्सरपासून वाचण्यासाठी लस उपलब्ध असून योग्य वयात ही लस घेतल्याने सर्वायकल कॅन्सरचा धोका 98 टक्के कमी होऊ शकतो.
नवी दिल्लीच्या इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलमधील गायनेकोलॉजी ओन्कोलॉजी विभागाच्या डॉक्टर सारिका गुप्ता यांनी सांगितले की, भविष्यात सर्वायकल कॅन्सर पासून वाचायचं असेल तर 9 ते 14 वर्षांमधील मुलींना एचपीवी लस घ्यायला हवी. एचपीवी लस ही 98 टक्के प्रभावी ठरून कॅन्सरचा धोका कमी करते. एचपीवी लस लावल्याने मुलींमधील रोगप्रतिकारशक्ती चांगली होते आणि ह्यूमन पॅपिलोमा व्हायरसचा धोका कमी होतो. सर्वायकल कॅन्सरची 90 टक्के प्रकरण या व्हायरसमुळे समोर आली आहेत.
advertisement
14 वर्षांपर्यंतच्या मुलींसाठी या लसीचा केवळ एक डोस पुरेसा आहे. 15 किंवा त्याच्याहून अधिक वर्षाच्या मुली किंवा महिलांना एचपीवी लसीचे दोन ते तीन डॉस घ्यावे लागतात. ही लस 26 वर्षांपर्यंत सर्वात जास्त प्रभावी ठरते आणि त्याहून अधिक वयाच्या महिलांवर याचा प्रभाव कमी होतो. डॉक्टर सारिका सांगतात की, एचपीवी लस ही सर्वायकल कॅन्सरच्या ऐवजी घश्याच्या कॅन्सरवर देखील प्रभावी ठरू शकतो.
advertisement
साधारण हॉस्पिटलमध्ये एचपीवी लसीची किंमत ही जवळपास 2 हजार असते, तर इंपोर्टेट लसीची किंमत ही 3 हजार 500 असते. तज्ञांच्या म्हणण्यानुसार सर्वायकल कॅन्सरचा धोका हा कमी रोगप्रतिकारकशक्ती असलेल्या महिलांना जास्त असतो. याऐवजी एचायवी संक्रमण, मल्टीपल सेक्सुअल पार्टनर, जेनिटल हाइजीनची कमतरता, कमी वयात मुलं होणं इत्यादींमुळे महिला कॅन्सरच्या शिकार होतात. स्मोकिंग केल्याने देखील सर्वायकल कॅन्सरचा धोका उद्भवू शकतो. तेव्हा 30 वर्षानंतर महिलांनी वेळोवेळी आरोग्याची तपासणी करून घ्यायला हवी.
advertisement
सर्वायकल कॅन्सरची काही लक्षण दिसू लागल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. जोडीदारासोबत शारीरिक संबंध ठेवल्यावर रक्तस्त्राव होणे, पिरियड्समध्ये अनियमितता येणे, ब्लड स्ट्रीम डिस्चार्ज होणे, मेनोपॉजनंतर रक्तस्त्राव होणे इत्यादी सर्वायकल कॅन्सरची लक्षण असू शकतात. त्यामुळे अशी लक्षण दिसू लागल्यावर डॉक्टरांशी संपर्क साधा.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Cervical Cancer : महिलांनी सर्वायकल कॅन्सरपासून कसं वाचायचं? 98 टक्के प्रभावी ठरतो हा उपाय
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement