या अहवालानुसार, मुंबईत गेल्या दहा वर्षांत डायरिया किंवा अतिसाराने सर्वाधिक मुंबईकर आजारी पडले होते. ही संख्या साधारण 9 लाखांच्या आसपास होती. त्या खालोखाल क्षयरोग (3 लाख 89 हजार 803), उच्च रक्तदाब (3 लाख 70 हजार 795), मधुमेह (3 लाख 70 हजार 81) आणि डेंग्यू (1 लाख 39 हजार 892) ने मुंबईकर आजारी पडले होते. 2014 ते 2022 या काळात झालेल्या मृत्यूंच्या कारणांचा विचार केला असता त्यात मधुमेह, श्वसनाचे गंभीर आजार, क्षयरोग आणि उच्च रक्तदाब यांचा क्रमांक लागतो. डायबिटीसमुळे 2014 मध्ये 2428 मृत्यू झाले होते. मृत्यूचा हा आकडा 2022 मध्ये वाढून 14 हजार 207वर पोहोचला होता ही वाढ जवळपास 485 टक्के आहे.
advertisement
'सावधान! प्रदूषण ठरतंय जीवघेणं ; स्मोकिंग न करताही होतोय कॅन्सर, अशी घ्या फुफ्फुसांची काळजीट'
धूम्रपान न करताही होतोय फुफ्फुसांचा कर्करोग
एकीकडे जीवनशैलीत झालेल्या बदलांमुळे देशाची अर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतले नागरिक आजारी पडत असताना दुसरीकडे प्रदूषणामुळे राजधानी दिल्लीतल्या नागरिकांना कॅन्सर आणि वॉकिंग न्यूमोनियाचा धोका वाढलाय. भारतामध्ये फुफ्फुसांच्या कर्करोगाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. मुळातच्या ज्या व्यक्ती अती धुम्रपान करतात त्यांना फुफ्फुसांचा कर्करोग होत असतो मात्र आता प्रदूषणामुळे धूम्रपान न करणाऱ्या लोकांमध्ये कर्करोग आढळून आलाय. त्यामुळे नागरीकांना आरोग्याची योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय.